MPSC Mains Result Saam Tv
मुंबई/पुणे

MPSC Result : मोठी बातमी! MPSC चा निकाल जाहीर, सोलापूरचा विजय राज्यात पहिला तर मुलींमध्ये आरती अव्वल

MPSC state service exam result topper list : एमपीएससी राज्य सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर झाला असून सोलापूरच्या विजय लामकाने यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर महिलांमध्ये आरती जाधव अव्वल ठरल्या आहेत. संपूर्ण मेरिट लिस्ट आणि तपशील जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Maharashtra MPSC Results Announced: महाराष्ट्र लोकसेवा अयोग अर्थात एमपीएससी परीक्षेचे निकाल जाहीर झाला आहे. २७ ते २९ मे यादरम्यान झालेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल आज जाहीर झाला आहे. या निकालावर सोलापूर जिल्ह्याने वर्चस्व मिळवले आहे. सोलापूर जिल्हातील विजय नागनाथ लामकाने (बैठक क्रमांक PN004038) हे सर्वसाधारण तथा मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आले आहेत. तर सोलापूर जिल्हातीलच आरती परमेश्वर जाधव (बैठक क्रमांक PN007031) या महिलांमधून राज्यात प्रथम आल्या आहेत. (Solapur Dominates with State Rank 1 and Women Topper)

महाराष्ट्र लोकसेवा अयोगातर्फे दिनांक २७ ते २९ मे, २०२५ या कालावधीत घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ चा अंतिम निकाल दिनांक ८ एप्रिल, २०२६ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार विविध २० संवर्गातील एकूण ४६१ पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. एमपीएससी परीक्षेत पास झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (सीमांकन गुण) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. प्रस्तुत निकालाद्वारे शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठर्थ नियुक्तीच्या वेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहे. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास, अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्राची पूर्तता नियुक्तीच्यावेळी न केल्यास तसेच शासन स्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासतांना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.

वैद्यकीय तपासणीस अनुपस्थित असलेले वैद्यकीय तपासणी पूर्ण न केलेल्या उमेदवारांचा अंतिम निकालात समावेश करण्यात आलेला नाही. परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाच्या व अन्य मुदयांसंदर्भात विविध मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे. प्रस्तुत परीक्षेकरिता मा. उच्च न्यायलय, मुंबई येथे दाखल रिट याचिका क्र.१७४६/२०२६प्रकरणी दिनांक १८ फेब्रुवारी, २०२६ रोजी झालेल्या आदेशानुसार संबंधित उमेदवारांचा निकालात समावेश करण्यात आला आहे. तथापि, प्रशासकीय कारणास्तव सदर उमेदवाराची शिफारस राखून ठेवण्यात आली आहे. सदर निकालानुसार दिव्यांग, अनाथ, खेळाडू, मागास इत्यादीसाठी आरक्षित पदावर शिफारसपात्र उमेदवारांची शिफारस सक्षम प्राधिकरणाकडून तपासणी करण्याच्या अधीन राहून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boat accident: समुद्रात नाव उलटली, १५ मुलांसह १३९ जणांचा मृत्यू; ११६ जण बेपत्ता

Maharashtra News Live Update: पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

SCROLL FOR NEXT