Maharashtra Political News
Maharashtra Political News Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Political News: महाराष्ट्रात पुन्हा राजकीय उलथापालथ? शिंदे गटाचे २२ आमदार ९ खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात

Vishal Gangurde

Vinayak Raut News: महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूंकप होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे 22 आमदार आणि नऊ खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

विनायक राऊत म्हणाले, 'मंत्री शंभूराज देसाई यांना काय करायचे आहे ते करू द्या. पण सध्या शिंदे गटातील बऱ्यात आमदारांमध्ये असंतोष आहे. शिंदे गटातील असंतोषाला पहिली वाचा खासदार गजानन कीर्तिकर यांनी फोडली. अनेक आमदारांचा भ्रमनिरास झाला आहे'.

'आमदारांना ५० खोके आणि कोट्यवधी रुपयांचा निधी देण्याचे कबूल करण्यात आले होते. मात्र, आता तसे घडताना दिसत नाही आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

'काही मंत्री सोडले तर उरलेल्या आमदारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. अनेकांना फसवणूक झाल्याचे वाटत आहे. अनेकांची परतीचा मार्ग स्वीकारावा लागतोय, अशी भावना आहे. याची सुरुवात खासदार गजानन कीर्तिकर यांनी केली आहे, असे राऊत म्हणाले.

'शिंदे गटाचे २२ आमदार आणि नऊ खासदार हे उद्धव ठाकरे यांच्या सर्वांच्या संपर्कात आहेत. तरीही या आमदारांना 'मातोश्री'चे दरवाजे या गद्दारांना उघडे राहणार नाही. शिंदे गटाच्या आमदारांबाबत उद्धव ठाकरे यांचा निर्णय सर्वांना मान्य असेल, असेही राऊत म्हणाले.

दरम्यान, शिंदे गटाकडून ठाकरे गटातील अनेक आमदार-खासदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा करण्यात येत आहे. शिंदे गटाकडून आमदार आणि खासदार शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील असा दावाही केला जात आहे. या दावा-प्रतिदाव्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : लोकसभेनंतर 'काँग्रेसी' एकत्र येणार?; प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?

Kolhapur Lok Sabha: कोल्हापूर लोकसभेचं मैदान कोण मारणार? वाढलेल्या टक्केवारीचा फायदा शाहू महाराजांना मिळणार की संजय मंडलिक यांना?

SRH vs LSG, IPL 2024: लखनऊच्या नवाबांना हैदराबादी दणका! ट्रॅव्हिस हेडने घातला विजयाचा 'अभिषेक'

Uddhav Thackarey: जे अदानी- अंबानींना दिलं ते काढून घेणारं का? उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींना सवाल

Today's Marathi News Live : मालदीवरून प्रकाश आंबेडकरांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT