Supriya sule  Saam Tv
मुंबई/पुणे

Supriya Sule : 'जो विरोधात बोलतो त्याच्यावर कुठली ना कुठली धाड टाकली जाते'

विरोधकांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार दुर्देवी असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

दौंड : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेली झाडाझडती हा विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रकार आहे. विरोधकांची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रकार दुर्देवी आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी केली आहे. दौंड शहरात माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. (Supriya sule Todays News)

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'जो विरोधात बोलतो त्याच्यावर कुठली न कुठली धाड टाकली जाते व त्याची तपशीलवार आकडेवारी आमच्याकडे उपलब्ध आहे. परंतु सत्ताधारी ज्यांच्यावर भ्रष्टाचार किंवा अन्य आरोप करतात त्या व्यक्ती जेव्हा त्यांच्या पक्षात जातात तेव्हा हेच आरोप विरघळून जातात. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची एक देश - एक पक्ष, ही भूमिका दडपशाहीची आहे. आम्ही मात्र राज्यघटनाप्रेमी असून आमचा निवडणूक आयोगावर विश्वास आहे.

त्या पुढे म्हणाल्या, 'राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी घाई करण्यात आली. परंतु आज दोन महिन्यानंतरही पुणे जिल्ह्यासाठी पालकमंत्री नियुक्त करण्यात न आल्याने शिक्षण, आरोग्य, आदी सर्वसामान्यांशी निगडित कामांविषयीचे निर्णय रखडले आहेत. (Supriya sule Latest News)

निर्मला सीतारमण यांचे जंगी स्वागत केले पाहिजे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बारामती मतदारसंघाचा दौरा करणार असतील तर आपण सगळ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले पाहिजे. दिवंगत माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी देखील विकासकामांसाठी बारामतीचा दौरा केला होता. बारामती सर्वांना हवी असते. या मतदारसंघात काहीतरी विशेष आहे ,म्हणूनच लक्ष घातले जात असेल, अशी टिप्पणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandup : भांडुपमध्ये मोठी दुर्घटना, पहिल्या मजल्यावरून ९ जण खाली पडले; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT