sanjay raut devendra fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut On Devendra Fadnavis: 'देवेंद्र फडणवीस यांच्या कानात हवा गेली', संजय राऊतांचा उपमुख्यमंत्र्यांना खोचक टोला

Priya More

Mumbai News: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) हे मंगळारी कोल्हापूर दौऱ्यावर (Kolhapur Tour) जाणार होते. पण अचानाक देवेंद्र फडणवीस यांचा नियोजित कोल्हापूर दौरा रद्द झाला त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. कान दुखत असल्यामुळे त्यांनी हा दौरा रद्द केले असल्याचे कारण समोर आले आहे.

फडणवसींच्या कान दुखीवरुनच आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 'देवेंद्र फडणवीस यांच्या कानात हवा गेली. त्यांचा कान दुखणार, बऱ्याच गोष्टी दुखणार.', अशा प्रकारची बोचरी टीका त्यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना फडणवीसांवर निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, 'देवेंद्र फडणवीसांच्या कानदुखीचे कारण खरं आहे. ज्याप्रकारचे वारे या महाराष्ट्रात वाहत आहे ते जर कोणाच्या कानात शिरलं तर कान दुखणारच.' तसंच, देवेंद्र फडणवीसांच्या विषयी मला आदर आणि सहानुभूती आहे. पण 105 आमदरांच्या नेत्याचं ज्याप्रकारे या 40 जणांनी त्यांचं मातेरं आणि पोतेरं केलं. त्यामुळे कान दुखणार, बऱ्याच गोष्टी दुखणार, पोटात दुखू शकते, छातीत दुखू शकते. या सरकारला अटॅकसुद्धा येऊ शकतो. काहीही होऊ शकतो. जर त्यांची प्रकृती बरी नसेल त्यांची नाराजी असेल तर समजून घेतलं पाहिजे.', असा टोला त्यांनी लगावला आहे.

संजय राऊत यांनी मंगळवारी वृत्तपत्रात छापून आलेल्या जाहिरातीवरुन देखील टीका केली आहे. 'पडद्यामागे काय घडतं हे मला माहिती आहे. शिंदे गटाच्या अंतरंगात काय हे स्पष्ट झालं. जाहिरातीत चित्र बदललं हे प्रत्यक्षात नाही. देवेंद्र फडणवीसांच्या दबावामुळे नवी जाहिरात आहे.' तसंच, 'शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रॉक्सी वॉर सुरु आहे. सरकार पडेल तेव्हा हे वॉर संपणार. शिंदे-फडणवीस सरकार हे अंतर्गत वादातून पडेल. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे त्याच्या आधारवर हे सरकार दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही.', असं त्यांनी सांगितले.

ईडीच्या कारवाईवर बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, 'तामिळनाडू, दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रात धाडी टाकून मंत्र्यांना नेत्यांना अटक केली जातेय. लवकरच दादा भूसे यांच्याविषयी ईडीकडे तक्रार करणार आहे. सीबीआयकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे मी तक्रार केली होती. पुढच्या दोन दिवसांत ईडीकडे तक्रार करणार आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टात जाणार. 178 कोटी रुपये शेतकऱ्यांचे जमा केले. गिरणा सहकारी साखर कारखाना बसवण्यासाठी हे पैसे गोळा केले. या पैशांचे मनी लाँड्रिंग झाले आहे.', असं देखील त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

VIDEO : विधानसभेच्या तोंडावर थोरातांना मोठा धक्का !

Maharashtra News Live Updates: तुळजापूर बोगस मतदान नोंदणी अर्ज प्रकरणाला राजकीय वळण

Shirdi Saibaba : साई चरणी ६८ ग्रॅम वजनाचा सोन्याचा ब्रोच अर्पण

SCROLL FOR NEXT