Sanjay Patil, Journalist Threat Controversy 
मुंबई/पुणे

खासदार संजय पाटलांचा संयम सुटला! पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत दिला दम, पोलिसांसमोरच हायव्होल्टेज ड्रामा

Sanjay Patil, Journalist Threat Controversy : पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर खासदार संजय पाटील संतापले. पोलिसांसमोरच पत्रकारांना धमकी दिल्याचा आरोप होत असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Namdeo Kumbhar

Sanjay Patil threatens journalists video : "मी खासदार आहे हे विसरून जाईन... यापुढे जर माझ्याकडे आलात, तर मार खाणार!" अशा अत्यंत अर्वाच्य भाषेत खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना थेट धमकी दिली आहे. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर खासदारांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट पोलिसांसमोरच पत्रकारांना दमदाटी करायला सुरुवात केली.

हा सर्व खळबळजनक प्रकार पत्रकारांच्या कॅमेऱ्यात जशास तसा रेकॉर्ड झालाय. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. "जाऊन कमिशनरकडे कम्प्लेंट करा, मी कोणाला घाबरत नाही," असं म्हणत खासदारांनी पत्रकारांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना खासदार संजय पाटील यांचा संयम सुटला आणि त्यांनी पत्रकारांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. कॅमेरा आणि माईक बंद करायला सांगत त्यांनी "मी खासदार आहे हे विसरून जाईन, खूप दिवस सहन केलं, आता उगाच डोक्यात जाऊ नका" असा सज्जड दम भरला.

"आता आलात तर मारून पाठवेन"

खासदार संजय पाटील पुढे संतप्त होत म्हटले की, "आता यापुढे माझ्याकडे आलात तर मार खाणार, हे लिहून घ्या आणि रेकॉर्ड करा." तसेच पोलिसांसमोरच त्यांनी पत्रकारांना हे आव्हान दिले आणि हवं तर पोलिसांत किंवा कमिशनरकडे जाऊन तक्रार करा, असेही ते म्हणाले. "तुम्हाला घराखाली उभं करतो, जेवायला देतो, तुम्ही थेट माझ्या घरापर्यंत आणि कॅमेरा घेऊन घरात आलात" असं म्हणत त्यांनी पत्रकारांच्या उपस्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला

'संजय पाटीलांच मानसिक संतुलन बिघडलयं' Sushma Andhare on Sanjay Patil

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संजय पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “संजय पाटलांचं मानसिक संतुलन बिघडलंय” अशी टीका केली आहे. पत्रकारांशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अंधारेंनी ही प्रतिक्रिया दिली असून या विधानामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

Maharashtra News Live Update: पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद

आता अनेक महीने वाट बघण्याची गरज नाही; 1 ते 3 दिवसांत मिळणार पासपोर्ट; पण ‘ही’ अट महत्त्वाची

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

Relationship Advice : जोडीदाराशी बोलताना ‘या’ ८ गोष्टी टाळा; नाही तर तुटू शकतं नातं

SCROLL FOR NEXT