Bandra Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Bandra Crime News: जेवायला मागवलं चिकन आणि मिळालं उंदराचं मांस; वांद्र्यातील किळसवाणी घटना

साम टिव्ही ब्युरो

सचिन गाड

Bandra News: रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना घरी जेवण बनवण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे अनेक व्यक्ती बाहेर हॉटेल्स किंवा ढाबा अशा ठिकाणी जेवण करणे पसंत करतात. अशात वांद्रे येथून अतिशय किळसवाणा प्रकार समोर आला आहे. (Latest Marathi News)

जेवणात उंदराचे मांस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे येथील एका ढाब्यात जेवण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीने चिकन डिश मागवली होती. या चिकन डिशमध्ये उंदराचे मांस आल्याने वांद्र्याच्या प्रसिद्ध रेस्टॉरंट विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वांद्रे येथील या ढाबाचे मॅनेजर, आचारी आणि चिकन पुरवठा करणाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भेसळयुक्त खाद्यपदार्थ पुरवणे आणि इतरांचा जीव किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात टाकल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खाजगी बँकेत सीनिअर मॅनेजर असलेले फिर्यादी आणि त्यांचा मित्र रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले असता मागवलेल्या चिकनमध्ये त्यांना उंदराच्या मांसाचा तुकडा आढळला. मॅनेजरला जाब विचारला असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे दोघांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

प्रत्येक व्यक्तीची जेवणाची आवड वेगवेगळी असते. उंदिर पाहिला तरी अनेकांना किळस वाटते. आजवर अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा हॉटेल्सवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केलीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT