Panvel Crime Saam TV
मुंबई/पुणे

संतापजनक: ५ वर्षाच्या चिमुरडीला आईच करायची बेदम मारहाण; घटना कॅमेऱ्यात कैद

पनवेल मध्ये आई-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिद्धेश म्हात्रे -

पनवेल: पनवेल मध्ये आई-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. नवीन पनवेलमधील (Panvel) एका सोसायटी मध्ये ५ वर्षाच्या मुलीला तिची आईच मारहाण करून मानसिक छळ करीत असल्याची घटना उघड झाली आहे.

ही आई या चिमुरडीला घरात बांधून ठेवायची तसंच तिला उपाशी ठेवत सतत बेदम मारहाण करत आपल्या मुलीला अमानुष पद्धतीने त्रास देत असल्याची घटना उघड झाली आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा निर्दयी प्रकार सोसायटीतील एका व्यक्तीने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात (Mobile) कैद करून तेथील एका सामजिक कार्यकर्त्याच्या निदर्शनास आणून दिला.

सामाजिक कार्यकर्त्यांनी खांदेश्वर पोलीस गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने घटनास्थळी धाव घेत हा सर्व प्रकार बघून मुलीच्या आईला ताब्यात घेतले असून खांदेश्वर पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT