Rescue teams continue operations at the Moshi garbage depot collapse site as the death toll rises to four. saam tv
मुंबई/पुणे

मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली; सरकारकडून पीडितांना 40 लाखांची मदत

Pimpri Chinchwad Moshi Accident Death Toll And Rescue Operation: मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा 4 वर; बचावकार्य सुरू असून सरकारकडून पीडितांना 40 लाखांची मदत जाहीर. एनडीआरएफकडून युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन.

Omkar Sonawane

गोपाल मोटघरे, साम टीव्ही

पुणे: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपो इमारत दुर्घटनेच्या या ठिकाणी सुरू असलेलं बचाव कार्य आज रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्याची शक्यता एनडीआरएफने व्यक्त केली आहे अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिली. दुर्घटनाग्रस्त इमारती खालून आतापर्यंत 14 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तर दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बचाव कार्य करणाऱ्या पथकाला आणखी दोन मृतदेह आढळून आले आहेत. ते काढण्यासाठी बचाव कार्यपथक युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आता चारवर पोहोचला आहे. मात्र आणखी 7 कर्मचारी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. अशी माहिती विजय सूर्यवंशी यांनी दिली.

मोशी कचरा डेपो दुर्पिंघटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकार तर्फे 5 लाख, पिंपरी चिंचवड महापालिके तर्फे 10 लाख आणि अँथनी कंत्राटदारातर्फे 25 लाखाची मदत देऊन मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील मुलांचा शिक्षणाचा खर्च अँथनी हा कंत्राटदार करणार असल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली.

तर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उशीर झाला असल्याने त्यांना घटनास्थळी येता आलं नाही. मात्र या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक घेतली असल्याचे रवी लांडगे यांनी सांगितलं. आज संध्याकाळपर्यंत बचाव कार्याचे चित्र स्पष्ट होईल. त्यांनी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर सुरक्षित काढल्यानंतर आपण या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यावर आणि कंत्राटदारावर योग्य ती कायदेशीर कारवाई करू असे रवी लांडगे यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

Shivsena Dispute : ...तर ठाकरे-शिंदे एकत्र येऊ शकतात; शिंदेसेनेच्या बड्या नेत्याचं भाकित, EXCLUSIVE

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ‘नाशिकची स्पेशल मिसळ थाळी’; चव अशी की पोट भरून खातील! 

SCROLL FOR NEXT