Jayant Patil On Farmers  Saam Tv
मुंबई/पुणे

Jayant Patil: १६ महिन्यात राज्यात ३००० हून अधिक शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, विधानसभेत जयंत पाटील संतापले

Jayant Patil On Farmers : आज विधानसभेत शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न मांडला.

साम टिव्ही ब्युरो

सुरज मसुरकर, साम टिव्ही, प्रतिनिधी

पावसाळी अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. ज्यात सर्व घटकांसाठी भरघोस आहे मदतींची घोषणा आणि योजनांचा पाऊस राज्य सरकारने पाडला. शेतकऱ्यांसाठी देखील या अर्थसंकल्पात अनेक योजना आणि विज बिल माफ यासारख्या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. पण या सर्व घोषणा या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आल्या आहेत, वास्तवात शेतकऱ्यांना आधी केलेल्या घोषणांची मदत मिळाली नाही, व या घोषणा विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, तसेच लोकसभा निवडणुकांध्ये आलेलं अपयश त्यामुळे मतदारांना भुलवण्यासाठी घोषणांचा पाऊस राज्य सरकार पाडत आहे, अशी विरोधकांनी टिका केली.

एका बाजूला हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभं आहे, असं म्हणतं. मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा फार चिंताजनक आहे, असे सांगत विधानसभेत कृषी मंत्र्यांसमोरच शेतकरी आत्महत्येचा पाढा वाचला.

तर राज्यात सर्वाधिक आत्महत्या या अमरावती व यवतमाळमध्ये झाल्या आहेत, अशी माहिती जयंत पाटील यांनी विधानसभेत दिली. जानेवारी २०२३ ते एप्रिल २०२४ या १६ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ३ हजार ९०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ही गंभीर माहिती विधानसभेत मांडली. तर जानेवारी २०२४ ते एप्रिल २०२४ या चार महिन्यात ८३८ आत्महत्या झाल्या. सर्वाधिक जानेवारी महिन्यात २३५ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले. एवढचं नाही तर फेब्रुवारी माहिन्यात २०८, मार्च महिन्यात २१५ , एप्रिल महिन्यात १८० , एवढ्या शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. ही आकडेवारी चिंताजनक आहे, असे सांगत लोकसभा निवडणुकीच्या गडबडीत शेतकऱ्यांवर सरकारने लक्ष दिले नाही, अशी टीकाही त्यांनी राज्य सरकारवर केली.

एका बाजूला खूप काही राज्य सरकार करतंय आणि दुसरीकडे हे भीषण वास्तव्य सभागृहात आज जयंत पाटील यांनी मांडले. तसेच सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या या अमरावतीत, संभाजीनगर व यवतमाळमध्ये झाल्या. अमरावतीत ३८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये २६७, तर यवतमाळ मध्ये १०८ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले, अशी माहिती जयंत पाटील यांनी सभागृहात दिली.

कुठे किती आत्महत्या?

  • अमरावती - ३८३

  • छत्रपती संभाजीनगर - २६७

  • यवतमाळ - १०८

  • नागपूर - ८४

  • वाशिम - ७७

  • जळगाव- ६२

  • बीड - ५९

  • धाराशिव - ४२

  • नांदेड - ४१

  • वर्धा - ३९

  • बुलढाणा- १८

  • धुळे - १६

  • अहमदनगर - १४

विधानसभेत शेतकरी आत्महत्याची आकडेवारी मांडताना जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टिका केली. ज्या यवतमाळमध्ये जास्त आत्महत्या झाल्या त्याच यवतमाळमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चाय पे चर्चा केली होती. फेक नॅरेटिव्ह म्हणाले, फेक नॅरेटिव्ह सेट केला म्हणाले. पण तुम्ही तुमच्या चुकांवर पांघरून घालू शकत नाही. ग्रामीण भागात शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. जनतेने ते पाहिलं आणि म्हणून मविआला जनतेने न्याय दिला. आता चंद्र पण आम्ही देऊ, अशा भूमिकेत राज्य सरकार आहे, अशी टिका जयंत पाटील यांनी केली.

तसेच अर्थसंकल्पात महाराष्ट्रात घोषणांची अतिवृष्टी झाली आणि ती फक्त दोन महिन्यांसाठी आहे, हे जनतेला माहीत आहे. लोकसभा निवडणूकीत पैशांचा महापूर आला होता, असंही जयंत पाटील म्हणाले. महत्तवाचे हे की सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर टिक करत राहतील, पण मुळ शेतकरी आणि सर्वसामान्यांचा प्रश्न सुटणार का ? हा मोठा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT