मूड महाराष्ट्राचा - Saam TV
मुंबई/पुणे

#कलमहाराष्ट्राचा - भाजपला रोखायचे तर आघाडी एकसंधच हवी!

जर राज्यात आज निवडणुका झाल्या तर कुणाला कौल मिळेल हा औत्सुक्याचा विषय आहे. साम-सकाळने घेतलेल्या मूड महाराष्ट्राचा या सर्वेक्षणातून याचे चित्र स्पष्ट होते आहे.

साम टिव्ही

मुंबई : जर राज्यात आज निवडणुका झाल्या तर कुणाला कौल मिळेल हा औत्सुक्याचा विषय आहे. साम-सकाळने घेतलेल्या मूड महाराष्ट्राचा या सर्वेक्षणातून याचे चित्र स्पष्ट होते आहे.

पक्ष म्हणून सारे स्वतंत्र लढल्यास भाजपला सर्वाधिक म्हणजे २७.९ टक्के जनाधार राहील; त्याखालोखाल शिवसेनेला २४ टक्के जनाधार राहील. त्यानंतर राष्ट्रवादी (२१.४ टक्के) आणि शेवटी काँग्रेस (१४.२ टक्के )असा कौल आहे.

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपला २५.७५, शिवसेनेला १६.४१, राष्ट्रवादीला १६.७१ आणि काँग्रेसला १५.८७ टक्के मतदान झाले होते. जवळपास तोच क्रम आताही कायम आहे.

महाविकास आघाडी विरूद्ध भाजप?

भाजपचा मतदार भक्कमच; काँग्रेस वगळून तर महाविकास आघाडी अशक्य आहे.,सत्तेवर राहायचे असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला काँग्रेसला सोबत घ्यावेच लागेल, असा महाराष्ट्राचा आजचा कौल आहे. सर्व्हेक्षणात ३९.८ टक्के लोकांना काँग्रेससह महाविकास आघाडी असेल, तरच आघाडीला मतदान करायचे आहे.

महाविकास आघाडी विरूद्ध भाजप अशी लढत झाल्यास भाजपलाच मतदान करू, असे सांगणाऱ्यांचे प्रमाण २७.५ टक्के आहे. म्हणजे भाजपच्या मतदानात फारशी घट होईल, असे चित्र नाही.

काँग्रेसला वगळले, तर महाविकास आघाडी सत्तेवर येण्याची चिन्हे नाहीत. कारण, राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीला केवळ १९.८ टक्के कौल आहे. हा महाराष्ट्रातील मतदारांची मानसिकता सांगणारा कौल वाटतो. एकत्र राहा, तरच भाजपला विरोधात ठेवू, असा मतदारांचा महाविकास आघाडीला संदेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये १९ लाखांचा पानमसाला- साठा जप्त FDA ची धडक छापेमारी

Ladki Bahin Yojana: अपात्र असतानाही ₹१५०० घेतले, कारवाई होणार का? आदिती तटकरेंनी एका वाक्यात विषय संपवला

Weight loss: वजन कमी करायचं आहे? मग मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी करा 'ही' योगासन

ICC Ranking: दो भाई, दोनों तबाही! ICC वनडे रँकिंग पाहून रोहितच्या चाहत्यांना धडकी भरेल

BP Control Tips: थंडीत बीपी वाढतोय? नियंत्रणात ठेवण्यासाठी हे उपाय ठरतील फायद्याचे

SCROLL FOR NEXT