Maharashtra Rain Alert Saam TV
मुंबई/पुणे

Weather Forecast : येत्या ४८ तासांत मान्सून महाराष्ट्रात धडकणार; आजपासून पुण्यासह 'या' भागात कोसळणार पाऊस

Rain Alert in Maharashtra : येत्या ४८ ते ७२ तासांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

Satish Daud

केरळमध्ये अडखळलेला मान्सून रविवारी (ता. २ जून) कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात दाखल झाला. त्यामुळे पश्चिमी वाऱ्यांनी वेग घेतला आहे. येत्या ४८ ते ७२ तासांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर आजपासून पुढील ३ दिवस तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सध्या अरबी समुद्रादतून राज्याकडे येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग वाढला आहे. त्यामुळे आजपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हा पाऊस ५ जूनपर्यंत सुरू राहील असंही सांगण्यात आलं आहे.

पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील तापमानात घट झाली असून पूर्व मौसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे आजपासून पुढील दोन ते तीन दिवस पुण्यात वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळतील.

पुण्यासोबत, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठवाड्यातही पावसाची शक्यता

मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात येत्या ५ जूनपर्यंत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतील. तर दुसरीकडे विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईसह उपनगरात सोमवारपासून ढगाळ वातावरण राहील. यंदा मुंबईत पावसाचं आगमन वेळेवर होणार असून पावसाचे प्रमाणदेखील समाधानकारक असणार आहे. येत्या ६ ते १३ जूनपर्यंत मान्सून पूर्णत: मुंबईत दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT