Mumbai Water Issue Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Water Level Decrease: मुंबईसह उपनगरात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस; धरणांमधील पाणीसाठा किती टक्क्यांनी वाढला? वाचा आकडेवारी

Mumbai Water Issue : सध्या प्रत्येक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणारआहे. कारण मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात मुबलक पाऊस पडलेला नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण ठिकाणी जोरदार पावसाळा सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या काही महिन्याभरात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या होत्या. चांगल्या पावसासाठी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला नाही कारण पश्चिम वाऱ्याचा वेग अत्यंत कमी आहे. या सर्व कारणांमुळे पाहिजे तसा पाऊस गेल्या महिन्याभरापासून पडलेला नाही, अशी माहिती हवामान खात्याने दिलेली आहे. विशेष म्हणजे मुंबई शहरासह मुंबई उपनगरातील शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात अनकुल असा पाऊस झाला नाही. त्यामुळे धरण क्षेत्रात केवळ पाच टक्के पाणी जमा झालेय. त्यामुळे मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्याभरात मुंबईसह मुंबई(Mumbai) उपनगरात पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. यामुळे मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. या सर्वांचा परिणाम मुंबईत सध्या असणारी १० टक्के पाणी कपात आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केलेले आहे.

एकाबाजूला मुंबईकरांवर पाणी (Water)संकट आहे तर राज्याच्या ग्रामी भागातही पाण्याची स्थिती अतिशय बिकट आहे. जुलै महिना सुरु होऊन काही दिवस झाले ती धरणांतील पाणीसाठा केवळ २३.८४ टक्के आहे. दुसऱ्या बाजूला मराठवाड्यातील धरणांमधील असलेला पाणीसाठा अवघा ९.७४ टक्के इतका राहिलेले आहे.

राज्यातील धरण (dam)क्षेत्रातील पाण्याची गंभीर स्थिती पाहता टॅंकरची संख्या काही प्रमाणात वाढवण्यात आली. सध्याच्या स्थितीला राज्यात साधारण १ हजार ८८ टँकरच्या साहाय्याने नागरिंकाना पाणीपुरवठा केला जातोय. तर राज्यातल्या ३ हजार ५९३ वाड्या- वस्त्यातही टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा करण्यात येतोय. मात्र येत्या चार ते सहा दिवसांत महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार तर महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडले, अशी माहिती मुंबई हवामान विभागाकडून देण्यात आली असून मुंबईकरांवरचे पाणी कपातीचेही टेन्शन मिटेल असे सांगण्यात आले आहे.

तीन वर्षांची ६ जुलैच्या पाणीसाठ्याची स्थिती

२०२२ या वर्षी - साधारण २३२७४४ दशलक्ष लिटर - अर्थात १६.०८ टक्के

२०२३ या वर्षी - साधारण २६४६५७ दशलक्ष लिटर - अर्थात १८.२९ टक्के

२०२४ या वर्षी - साधारण १५७४४९ दशलक्ष लिटर - अर्थात १०.८८ टक्के

उपलब्ध पाणीसाठा ( दशलक्ष लिटरमध्ये)

मोडक सागर - ३५२७२

तानसा- ३३०५१

मध्य वैतरणा- ३२७००

भातसा- ४७८५३

विहार- १०८३९

तुळशी- २४७६

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : या राशींच्या व्यक्तींना नागदेवता पावणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

Kolhapur Superstition : अंधश्रद्धेचा कहर! बाहुली, नारळ, लिंबू अन् एक चिठ्ठी; कोल्हापुरात घटस्फोटासाठी अघोरी प्रकार

Ashok Sharaf: सलमान खानने अशोक सराफ यांचा गळाच कापला; ३३ वर्षानंतर मामांनी सांगितला शुटिंगचा थरारक किस्सा

Micro Walking: मायक्रो वाकिंग म्हणजे काय? यामुळे कोणते फायदे होतात

SCROLL FOR NEXT