Monsoon Update Saam Tv
मुंबई/पुणे

Monsoon Update: राज्यात 'या' भागात आज रेड अलर्ट; पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राज्यात पुढील चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची (Rain) इशारा देण्यात आला आहे. मुंबई (Mumbai) , ठाणे, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड (Raigad) जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय विदर्भात देखील चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

हे देखील पाहा -

'या' भागात आज रेड अलर्ट!

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. ८ जुलै रोजी पालघर, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, नाशिक, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. ९ जुलै रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांनाही सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात विविध ठिकणी मुसळधार पाऊस

अकोल्यातील आगर गाव परिसरात ढग फुटी सदृश पाऊस झाला . गावाला लागून असलेल्या लेंडी नाल्याला पूर आल्याने गावातील अनेकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे गावकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मुसळधार आलेल्या पावसामुळे परिसरात एकच दाणादाण उडाली तर अकोला शहरातील अनेक रस्ते या पावसामुळे जलमय झाले होते.

रत्नागिरीत सकाळपासून पावसानं दमदार अशी बँटींग सुरु केलीय.जिल्ह्यात जोरदार सरी कोसळताहेत जिल्ह्यार रेड अलर्ट जारी करण्यात आला असून 10 जुलै पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय त्याचबरोब समुद्रात 40-50 किमी ताशी वेगाने वारे वाहतील त्यामुळे मच्छिमारी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे.

सिंधुदुर्गात पहाटे पासूनच पावसाचा जोर असून थांबून थांबून मोठ्यासरी कोसळत आहेत.त्यामुळे अनेक ठीकाणी सकल भागात पाणी साचू लागले आहे.हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानूसार काल थोडा कमी पाऊस झाला असला तरी आज मात्र पहाटे पासूनच जिल्ह्यात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.

बुलढाण्या बहुतांश भागात जोरदार पाऊस पडला. संग्रामपूर - शेगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक नदी नाल्याना पूर आला आहे तर सायंकाळी संग्रामपूर तालुक्यातील जस्तगाव येथील काही शाळकरी मुले घरी जाताना पुराच्या पाण्यात अडकली होती पण गावकऱ्यांच्या समयसुचकतेने या मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. नुकत्याच शेतीत पेरणी करण्यात आलेलं बियाणे मात्र या मुसळधार पावसाने वाहून गेल्याने अनेक शेतकऱ्याचं नुकसान देखील झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nawab Malik News : मानखुर्दमध्ये नवाब मलिक यांचा पराभव | Marathi News

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Sujay Vikhe Patil : जिल्ह्यात सत्तेचा माज करणाऱ्यांचा कार्यक्रम लावला; संगमनेरमधील विजयानंतर सुजय विखे यांचा थोरातांवर निशाणा

Maharashtra Assembly Election Result: तुमचा आमदार कोण? २८८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी पाहा

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा आमदार

SCROLL FOR NEXT