संपूर्ण देशातून अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती Saam Tv
मुंबई/पुणे

संपूर्ण देशातून अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती

हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली - दक्षिण भारत आणि ईशान्य भारतात गेल्या काही दिवसांपासून नैऋत्य मोसमी वारे अडकून पडल्यानंतर, अखेर मान्सूनने संपूर्ण देशातून घेतला निरोप घेतला आहे. अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली आहे. आज म्हणजेच २५ ऑक्टोबर २०२१ रोजी संपूर्ण देशातून मान्सून परतला असल्याची माहिती देण्यात आली आहे. हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. पहिल्यांदाच गेल्या काही वर्षांत मान्सून इतके दिवस भारतात सक्रिय राहिला आहे.

यावर्षी मान्सून सामान्य राहणार असून सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती. त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला. मराठवाडा, विदर्भ, मध्य आणि उत्तर महाराष्ट्राला परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. यामध्ये शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे.

दुसरीकडे, पुणे जिल्ह्यात तापमानाचा पारा देखील घसरला आहे. रविवारी शहरात 16.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. तर लोहगाव येथे 17.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT