Rain News in Maharashtra Today Saam TV
मुंबई/पुणे

IMD Rain Alert : मुंबईसह कोकणात मान्सून पुन्हा सक्रिय; आजपासून पुढील ५ दिवस 'या' भागात कोसळणार पाऊस

Rain News in Maharashtra Today : अरबी समुद्रात मौसमी वारे वाहू लागल्याने मुंबईसह कोकणात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे.

Satish Daud

पावसाची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आठवडाभराची विश्रांती घेतल्यानंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. अरबी समुद्रात मौसमी वारे वाहू लागल्याने मुंबईसह कोकणात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबई-कोकणात कोसळणार पावसाच्या सरी

मान्सून दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस झाला होता. मात्र, त्यानंतर पावसाने पाठ फिरवली. गेल्या ४-५ दिवसांपासून मुंबईत पावसाने उघडीप दिली होती. पण सोमवारी (ता. १७) पुन्हा मुंबईत ढगाळ वातावरण तयार झालं. काही तासांतच मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या.

दरम्यान, आज मंगळवारी आणि उद्या बुधवारी मुंबईसह कोकण पट्ट्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातही जोरदार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

महाराष्ट्रात पुढील ५ दिवस जोरदार पाऊस

मुंबईसह राज्यातील अनेक भागात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून पुढील ५ दिवसांत मराठवाड्यासह विदर्भात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी बरसतील.

विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, अमरावती, अकोला, यवतमाळा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात तुफान पाऊस होईल, असं सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli : थरारक! इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली; दुर्घटनेमध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू

Beed Crime: कराड गँगची गुंडगिरी सुरूच;आधी पत्नीला मारहाण नंतर तरुणाला घासायला लावलं नाक, व्हिडिओ व्हायरल

Astro Tips For Money: पैशाच्या कमतरतेमुळे त्रस्त आहात? करा 'हे' उपाय, होईल भरभराट

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का बसणार, नाराज नेता शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर

Maharashtra Live News Update: गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील इमारत कोसळली तीन जण जागीच ठार

SCROLL FOR NEXT