monkeys are facing summer heatwave on mumbai pune expressway दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

माकडांनाही उन्हाच्या झळा; पुणे-मुंबई जुन्या एक्सप्रेस हायवेवर माकडे सैरभैर

Monkey's On Mumbai-Pune Express Way : अन्न-पाण्याच्या शोधत निघालेली ही माकडे जखमी होऊन जीव सोडतात.

दिलीप कांबळे

मावळ, पुणे : सध्या मनुष्य प्राण्याला उन्हाच्या (Summer) झळा सोसवत नाही. अंगाची लाही लाही होताना दिसते. याचे मुख्य कारण म्हणजे जंगले तोडून मानवाने सिमेंट ची जंगले उभी केली आहेत. त्यामुळे आता वन्य जीव देखील या सिमेंटच्या जंगलात येऊ लागले आहेत. अन्न आणि पाण्याच्या शोधत सध्या पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील खंडाळा घाटात अनेक माकडे (Monkey's) येताना दिसून येत आहेत. (monkeys are facing summer heatwave on mumbai pune expressway)

हे देखील पाहा -

अन्न आणि पाणी यांची सोय झाली की ही माकडे निघून जातात. मात्र हायवेवरून (Old Mumbai-Pune Express Way) अनेक जण जोरात गाड्या चालवतात त्यामुळे अनेकदा अन्नाच्या शोधात असलेली ही माकडे जखमी होतात. अन्न-पाण्याच्या शोधत निघालेली ही माकडे जखमी होऊन जीव सोडतात. त्यामुळे या खंडाळा घाटातून जाताना पर्यटकांनी काळजी बाळगावी असं आवाहन स्थानिकांनी केलं आहे. तर एखाद्या मुक्या प्राण्याला पर्यटकांनी देखील अन्न-पाणी देऊन मदतीचा हात द्यावा असं आवाहन पर्यटकांनी देखील केलं आहे. लॉक डाऊन काळात ही माकडे जेवणाच्या आणि पाण्याच्या शोधत यायचे, परंतु कोणीच पर्यटक किंवा माणसे नसल्याने ते भुकेला जीव घेऊन निघून जायचे असा अनुभव देखील स्थानिकांनी सांगितला.

पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मंकी पॉईंटवरून जर तुम्ही प्रवास करत असाल तर याठिकाणी जाताना काही अन्न पदार्थ, पाणी घेऊन जा. परंतु आपल्या वाहनामुळे या माकडांना हानी पोहचणार नाही याची देखील काळजी घ्या हेच आवाहन स्थानिकांनी केलंय.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Death: प्रसिद्ध अभिनेता अन् गायकाचे हार्ट अटॅकने निधन, शेवटची पोस्ट चर्चेत

Scholarship Exam 2025-26 : शिक्षण विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शिष्यवृत्ती परीक्षा आता पूर्वीप्रमाणे ४ थी आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी

Maharashtra Live News Update: वेण्णालेक येथे अडकलेली बोट बाहेर काढण्यात आली, पर्यटकांनी सोडला सुटकेचा निश्वास

भाजप नेत्याच्या बेडरूमला आग, रॉकेट थेट बाल्कनीत घुसला; मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं अन्..

Sleep deprivation: कमी झोप घेताय? शरीर देतंय धोक्याचे सिग्नल, वेळेत सांभाळा स्वतःला

SCROLL FOR NEXT