Modified silencer smashed by bandra traffic police सुरज सावंत
मुंबई/पुणे

Bandra Traffic Police: कर्णकर्कश आवाज करणाऱ्या माॅडीफाय सायलेन्सर्सचा पोलिसांकडून चुराडा

Bandra Traffic Police: पोलिसांनी दुचाकींना कर्कश मॉडीफाय केलेले सायलेन्सर लावून फिरणाऱ्या वाहनांवर १९८ मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करत, हे माॅडीफाय सायलेन्सर ताब्यात घेतले होते.

सुरज सावंत

मुंबई: दुचाकींना मॉडीफाय केलेले सायलेन्सर लावून कर्णकर्कश आवाज करत फिरणारे दुचाकीस्वार आपण अनेकदा पाहतो. हॉस्पिटल्स, शाळा, महाविद्यालये तसेच इतर शांत व सार्वजनिक ठिकाणी या सायलेन्सरमुळे (Bike Silencer) मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण (Noise Pollution) होते, शिवाय अनेकांना विनाकारण त्रासही होत होता. दुचाकीवरून हवा करत फिरणाऱ्या अशाच अतिउत्साही युवकांची हवा काढण्याची कारवाई मुंबई पोलिसांच्या वांंद्रे वाहतूक विभागाने (Bandra Traffic Police, Mumbai) केली आहे. (Modified silencer smashed by bandra traffic police)

हे देखील पहा -

ही कारवाई मध्य वाहतूक पोलिस विभागाचे (Bandra Traffic Police) पोलिस उपायुक्त राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विशाल खैरे यांंच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी दुचाकींना कर्कश मॉडीफाय केलेले सायलेन्सर लावून फिरणाऱ्या वाहनांवर १९८ मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करत, हे माॅडीफाय सायलेन्सर ताब्यात घेतले होते. इतकंच नाही तर काढून टाकलेल्या सायलेन्सरचा पुनर्वापर होऊ नये म्हणून ते भोंगे एका रोडरोलरखाली चिरडून नष्ट करण्यात आले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाणे महापालिकेत शिंदेसेना अन् भाजपमध्ये खडाजंगी

IDFC फर्स्ट बँकेत 590 कोटी रुपयांचा मोठा घोटाळा, बँकिंग क्षेत्रात खळबळ

Buldhana : आधी अत्याचार अन् नंतर हत्या ; नदीत आढळला १७ वर्षीय गतिमंद तरुणीचा विवस्त्र मृतदेह

Rashmika-Vijay Wedding: 'Virosh'ची लगीनघाई...; विजय देवरकोंडा अन् रश्मिका मंदान्ना उदयपुरमध्ये पोहोचले, पाहा VIDEO

Flying Flea C6 Bike: आली रे आली! Royal Enfield ची इलेक्ट्रिक बाईक आली, आत्ताच बजेटचा करा प्ल‍ॅन

SCROLL FOR NEXT