MNS's statewide Maha Aarti on Akshayya Tritiya Saam Tv
मुंबई/पुणे

अक्षय्य तृतीयेला मनसेची राज्यभर महाआरती; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

MNS Maha Arti On Akshaya Tritiya: या बैठकीत अयोध्या दौरा आणि 1 मे ची सभा यासाठी नियोजनाबाबत चर्चा झाली.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे ला अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यभर महाआरती (Maha Arti) करण्याचे आदेश मनसैनिकांना दिले आहे. त्यानुसार आता मनसे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. आज (मंगळवार) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) शिवतीर्थ बंगल्यावर बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय झाला. तसेच या बैठकीत अयोध्या दौरा आणि 1 मे ची सभा यासाठी नियोजनाबाबत चर्चा झाली. (MNS's statewide Maha Aarti on Akshayya Tritiya; Raj Thackeray's orders to MNS Workers)

हे देखील पहा -

शिवतीर्थ बंगल्यावर झालेल्या या बैठकीत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार, गजानन काळे, शिरीष सावंत आणि इतर नेते उपस्थित होते. ३ मे चं अलटीमेटम राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलं होतं. त्याचप्रमाणे मशिदीवरील भोंग्या संदर्भातील उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे संतोष पाचलग यांनाही राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीत याचिकेतील सर्व बारकावे आणि अतिरिक्त माहिती याविषयी चर्चा त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत केली. ३ मे ला मशिदीवरील भोंगे उतरवले नाही, तर मनसे नेमकी काय भूमिका घेणार? काय पावलं उचलली जातील? यावर या बैठकीत चर्चा झाली. तसेच मनसेचे शिष्टमंडळ आता ॲडीशनल सीपी डाॅ. ज्ञानेश्वर चव्हाण यांची भेट घेण्यासाठी निघाले असून भोंग्याच्या विषयावर ही भेट असेल.

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातून दोन घोषणा केल्या. पहिली म्हणजे १ तारखेला औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार. आणि दुसरी म्हणजे अतिशय महत्त्वाचं ५ जून रोजी अयोध्येला जाणार. या दौऱ्यात कार्यकर्त्यांना अयोध्येत जाण्यासाठी मनसेकडून (MNS) ट्रेन बुक करण्यात येणार आहे. १० ते १२ ट्रेन बुक करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नाशिक, नागपूर या ठिकाणाहून या ट्रेन बुक केल्या जाणार आहेत. राज ठाकरे मागच्या काही काळापासून आपली भूमिका अतिशय प्रखरपणे मांडत आहेत.

आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा:

राज ठाकरेंनी गुढीपाडवा सभेत घेतलेल्या मशिदींवरील भोंग्याविरोधातील भूमिकेवर ते उत्तर सभेत ठाम राहिले आहेत. दरम्यान एकीकडे राज ठाकरे अयोध्या दौऱ्याला जाणार आहेत. तर दुसऱ्या बाजून मंत्री आदित्या ठाकरेही अयोध्या दौऱ्याला जाणार आहेत. त्यांनी अजून दौऱ्याची तारीख जाहीर केलेली नाही. नाशिकमध्ये संजय राऊतांनी बोलताना आदित्या ठाकरे अयोध्या दौऱ्याला जाणार असल्याची माहिती दिली होती. आदित्या ठाकरेंनीही याला अधिकृत दुजोरा दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT