मराठी भाषेसाठी मनसेचा PVR सिनेमा कंपनीला सज्जड दम SaamTvNews
मुंबई/पुणे

मराठी भाषेसाठी मनसेचा PVR सिनेमा कंपनीला सज्जड दम

ग्राहकांच्या समस्या निवारण्यासाठी PVR सिनेमा कंपनीकडून मराठी भाषेत सेवा प्रदान होत नसल्याचे एका व्यक्तीने निदर्शनास आणून दिले.

प्रदीप भणगे

डोंबिवली : मराठी भाषा गौरव दिन हा नुकताच राज्यात साजरा करण्यात आला. मात्र, महाराष्ट्रात मराठी भाषा (Marathi Language) जतन किती कंपन्या करत आहेत हे पाहण शासनाचं देखील काम आहे. संपूर्ण देशभरात पीव्हीआर (PVR) हि कंपनी सिनेमा तिकीट प्रेक्षकांना आरक्षित करून देत असते. मात्र, या कंपनीच्या आयव्हीआर (कॉलसेंटर) मध्ये मराठी भाषा उपलब्ध नसल्याचे एका व्यक्तीने उघड केले.

हे देखील पहा :

मराठी सोडून इतर भाषा त्यात दिसत होत्या. दरम्यान, त्या व्यक्तीने यासंदर्भात मराठी भाषा उपलब्ध का नाही? असा जाब देखील विचारला. मात्र, कंपनीच्या (Company) प्रशासनाने यावर उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्या व्यक्तीने मनसेच्या कार्यकर्त्यांना याबाबत तक्रार केली आणि मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी लगेच एक्सपीरिया मॉल गाठले आणि पीव्हीआर कंपनीच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. तसेच संबंधित आयव्हीआर मधूनच कॉल मराठी भाषा नेच सुरुवात झाली पाहिजे अशी भूमिका मनसेचे ठणकावून सांगितले.

यावेळी मनसेचे डोंबिवली (Dombivli) शहर संघटक योगेश पाटील, डोंबिवली शहर सचिव अरुण जांभळे, मनसे विभाग अध्यक्ष रक्षित रायकर यांसह अन्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.दरम्यान येत्या काही दिवसात हा बदल दिसून आला नाहीतर पुढील आंदोलनाला पीव्हीआर सिनेमाचं जबाबदार असेल असा सज्जड दमच मनसेचे या कंपनीला दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

MHADA Lottery : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या २,६४० घरांच्या सोडतीची तारीख जाहीर; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

SCROLL FOR NEXT