Space suit protest of MNS in Ghatkopar Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai: मनसैनिक बनले अंतराळवीर! घाटकोपरच्या खड्ड्यांवर मनसेचं स्पेसवॉक सुरू होताच खड्डे बुजवायला सुरुवात

Space suit protest of MNS in Ghatkopar: या आंदोलनात मनसैनिक अक्षरशः स्पेस सुट परिधान करत घाटकोपरच्या खड्डेमय रस्त्यांवर उतरले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे

मुंबई: आपल्या अनोख्या आंदोलनांमुळे (Agitation) सतत चर्चेत राहणारा पक्ष म्हणजे राज ठाकरेंची मनसे (MNS) अर्थात् महाराष्ट्र नवनिर्माण सेना. सत्ता नसली तरी आपल्या खळखट्याक आंदोलनांनी मनसेने अनेकांची झोप उडवली आहे. यंदा मनसेने मुंबईतील घाटकोपरमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन केलं आहे. या आंदोलनात मनसैनिक अक्षरशः स्पेस सुट परिधान करत घाटकोपरच्या रस्त्यांवर उतरले. मुंबईच्या खड्ड्यांतून मनसैनिकांनी अंतराळाची सफर घडवली आहे. अंतराळवीराचे किट घालून खड्यांविरोधात मनसेने केलेले हे आंदोलन चांगलेत गाजत आहे. (MNS Unique Agitation In Ghatkopar)

हे देखील पाहा -

मुंबईच्या घाटकोपरमधील खड्ड्यांना त्रस्त होऊन मनसेकडून मुंबईत अनोखं आंदोलन करण्यात आलं. अंतराळवीराचे कीट परिधान करून रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात मनसेने पदाधिका आणि कार्यकर्त्यांकडून रोष व्यक्त करण्यात आला. घाटकोपरमधील पंतनगर भागात अनेक ठिकाणी खड्डेच-खड्डे पाहायला मिळत असल्याने हे मनसेकडून हे आंदोलन केलं गेलं आहे. मनसेचे आंदोलन सुरू होताच महापालिकेने कोल्डमिक्स आणून खड्डे बुजवायला सुरवात केली आहे.

मनसेनंं या आंदोलनाला "त्वरा करा चंद्रावर जाण्याची व विवर बघण्याची सुवर्णसंधी जनआंदोलन" असं नावं दिलं आहे. बृहन्मुंबई महानगर पालिका एन विभाग कार्यालय,जवाहर रोड,घाटकोपर स्टेशन लगत हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी मनसैनिकांनी स्पेस सूट परिधान केला तर होताच, सोबत अवकाशयानाची प्रतिकृतीही बनवली होती. अशा पेहेरावातच त्यांनी पालिकेविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी मनसैनिकांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. दरम्यान मनसेच्या सदस्य नोंदणीची आजपासून सुरुवात झाली असून राज ठाकरे आज पुण्यात आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT