Raj Thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

MNS News: राज ठाकरेंचं टेन्शन वाढणार? वसंत मोरेंनंतर मुंबईतील नेता नाराज; मनसेच्या मेळाव्याला दांडी

माहीम विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार नाराज असल्याची चर्चा आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>> रुपाली बडवे

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मनसेचा महत्त्वाचा मेळावा पार पडत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) स्वत: कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

मात्र एकीकडे पक्ष मजबुतीच्या दिशेने पावलं उचलली जात असताना पक्षातील नेत्यांची नाराजी राज ठाकरेंसाठी डोकेदुखी ठरु शकते. कारण वसंत मोरे यांच्यनंतर आता मुंबईतील मनसेचा एक नेता नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. (Latest Marathi News)

पुण्यानंतर मुंबईतही मनसेचा नेता नाराज असल्याचं समोर येत आहे. माहीम विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार नाराज असल्याची चर्चा आहे. मनसेच्या मेळाव्याला यशवंत किल्लेदार यांनी दांडी मारल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे.

पुण्यात वसंत मोरे यांच्या नाराजीनंतर मुंबईत यशवंत किल्लेदारांची नाराजी पक्षाला परवडणारी नाही पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे यशवंत किल्लेदार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

वसंत मोरे का आहेत नाराज?

मी नाराज नाही, तर माझे कार्यकर्ते नाराज आहेत. मेळाव्याला मला बोलवलं मात्र बोलू दिलं नाही. त्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतर कार्यकर्ते मला विचारत होते, तुम्ही का बोलले नाही. मी त्यांना सांगितलं मला माहिती नाही वरिष्ठांना विचारा. तात्या आम्ही तुम्हाला ऐकायला आलो होतो, असं कार्यकर्ते म्हणत होते. हीच परिस्थिती माझ्या मतदारसंघातील मेळाव्यात झाली होती. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना उत्तरं द्यावीत असं का होतं, असं वसंत मोरे यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT