Pune News Saam tv
मुंबई/पुणे

Pune News : महाराष्ट्रात फक्त मराठीच; पुण्यात ग्राहकांशी मराठी भाषेत न बोलणाऱ्या मेडिकल मालकाला मनसैनिकांकडून चोप, VIDEO

medical owner beaten by mns party workers : पुण्यात ग्राहकांशी मराठी भाषेत न बोलणाऱ्या मेडिकल मालकाला मनसैनिकांकडून चोप देण्यात आला आहे. या मेडिकल मालकालाचा चोप देतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

Vishal Gangurde

सचिन जाधव, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीच्या मुद्द्यावरून पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये दोन परप्रांतीय महिलांनी मराठी महिला व्यावसायिकेला त्रास दिल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता पुण्यात एका मेडिकल मालकाने मराठी भाषा कळत नसल्याचे म्हणत मराठी ग्राहकांशी वाद घालत असल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर मराठी ग्राहकांशी वाद घालणाऱ्या पुण्यातील या मेडिकल मालकाला मनसैनिकांनी चोप दिला आहे. या मेडिकल मालकाला चोप देतानाचा व्हिडिओ मनसैनिकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पुण्याच्या धानोरी उपगरातील परप्रांतीय व्यावसायिकाने गुरुवारी मराठी ग्राहकांशी वाद घातला. या मेडिकल मालकाने मराठी भाषा मला कळत नाही, मराठीतच बोलणे हा नियम आहे का? मी मराठीत बोलणार नाही, काय करायचे ते करा?असे म्हणत ग्राहकांशी वाद घातला, असा आरोप मराठी ग्राहकांचा आहे. त्यानंतर मराठी ग्राहकांशी उद्धटपणे वर्तन करणाऱ्या मेडिकल मालकाला मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्टाईलने दणका दिला. या मेडिकल मालकालाचा चोप देतानाचा व्हिडिओ अभिषेक म्हमूनकर या मनसैनिकाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

पुण्यातील धानोरी परिसरात एका परंप्रातीय व्यावसायिकाचे मेडिकल आहे. या मेडिकलचा मालक मराठी ग्राहकांशी उद्धटपणे वागत असल्याची तक्रार काही ग्राहकांनी मनसैनिकांकडे केली. यानंतर मनसैनिकांनी या मेडिकल चालकाला भेट देऊन समाचार घेतला. त्यानंतर या मनसैनिकांनी मनसे स्टाईलने मेडिकल मालकाला चोप दिला. महाराष्ट्रात फक्त मराठीच, पुण्यात मराठी भाषेचा आणि अवमान सहन करणार नाही, असं म्हणत मनसैनिकांना या मालकाला जोरदार चोप दिला.

मनसैनिकाने पोस्टमध्ये काय म्हटलं?

मनसैनिकाने या घटनेचा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये म्हटलं की, पुण्यातील धानोरीमधील परप्रांतीय मेडिकल मालकाने मराठी भाषेचा अपमान करत मराठी बोलण्यास नकार दिला त्यामुळे मनसे स्टाईल दणका दिला. तसेच मराठी मुलाचा अपमान केला होता. त्यामुळे त्या मेडिकल मालकाला मनसैनिक गणेश पाटील, कृष्णा मोहिते, मनोज ठोकळ, येवले, अचितुराव मोरवडे, आदी महाराष्ट्र सैनिकांनी चोप दिला'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT