सहज पतंग उडवण्यात अर्थ नाही, भाजप-मनसे युतीवर विनोद तावडे यांची प्रतिक्रिया Saam Tv News
मुंबई/पुणे

सहज पतंग उडवण्यात अर्थ नाही, भाजप-मनसे युतीवर विनोद तावडे यांची प्रतिक्रिया

माजी मंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे हे कल्याणमध्ये कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

प्रदीप भणगे

कल्याण - माजी मंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे (Vinod tawde BJP) हे कल्याणमध्ये (kalyan) कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. गेल्या 2 वर्षांपासून भाजप नेते विनोद तावडे हे मुख्य प्रवाहातून बाहेर आहेत. मनसे (maharashtra navnirman sena -MNS) सोबत युतीबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचाराला असता त्यांनी सांगितले की, माझ्याकडे हरियाणाची जबाबदारी होती आणि महाराष्ट्रमध्ये माझा 10 दिवस प्रवास असतो, यापुढेही असणार आहे. (mns not alliance with bjp says vinod tawde)

हे देखील पहा -

भाजप-मनसे युतीवर पुढे ते म्हणाले की, सहज कोणाची भेट झाली यावर पतंग उडवण्यात अर्थ नाही. नाशिकमध्ये मनसेने (Nashik MNS) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजप ज्या पद्धतीने काम करतो आहे, त्याच पद्धतीने काम करत राहील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil BJP) यांची भेट घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते. तसेच मनसे हा शत्रुपक्ष नाही, राज ठाकरेंनी परप्रांतीयांबद्दल भुमिका बदल्यास युतीबाबत विचार करु असंही भाजपडून सांगण्यात आलं होतं. मात्र मनसे - भाजप युती होईल किंवा नाही याबद्दल कुणीही ठोस असं मत अद्यापतरी मांडलेलं नाही.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT