MNS MLA Raju Patil saam tv
मुंबई/पुणे

MNS Raju Patil News : आत्ता सेनेचे दोन गट, त्यावेळी शिवसेना एकच होती ना; मनसे आमदार राजू पाटलांचा राेख काेणावर ?

हे सर्व एकाच माळेचे मणी असल्याचे आमदार राजू पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Siddharth Latkar

- अभिजीत देशमुख

Kalyan News : मुंबईत कोविड घोटाळा झाला आहेच. त्याबरोबर ठाणे, कल्याण डोंबिवली,उल्हासनगर, अंबरनाथ पालिकांमध्ये झालेल्या कोविड घोटाळा झाल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे. बीएमसी प्रमाणे ठाणे, कल्याण डोंबिवली,उल्हासनगर, अंबरनाथ पालिकांमध्ये झालेल्या कोविड घोटाळ्याची चौकशी व्हायलाच हवी असे ट्विट मनसे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी केले आहे. (Maharashtra News)

या ट्विटमध्ये राजू पाटील यांनी मुंबई महानगरपालिकेत कोविड घोटाळा (covid-19) झालाच आहे. पण त्याच बरोबर ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या पालिकांमध्ये पण प्रचंड प्रमाणात कोविड घोटाळा झाला असल्याचे नमूद केले आहे.

आत्ताचे सेनेचे दोन गट असले तरी 'त्यावेळी एकच शिवसेना होती.यांनी फक्त पालिका वाटून घेतल्या होत्या. हे सर्व एकाच माळेचे मणी आहेत कारण या सर्व पालिकांमध्ये यांचीच सत्ता किंवा प्रशासक होते.

मुंबई महानगरपालिकेतील कोविड घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे पण त्याच बरोबर ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या पालिकांमध्ये झालेल्या कोविड घोटाळ्याची चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

Maharashtra News Live Update:अण्णा हजारे उपचारासाठी मुंबईला हलवले

मोठी बातमी! अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल, पाहा हेल्थ अपडेट

Indian Railways: भारतातील ही 3 स्टेशनं मानली जातात सर्वात घाणेरडी, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन आहे का यादीत?

SCROLL FOR NEXT