Raj Thackeray News  Saam Tv
मुंबई/पुणे

Vasant More : राज ठाकरे यांच्या पत्रावर वसंत मोरे यांची प्रतिक्रिया; म्हणाले...'मी साहेबांचा आदेश...'

राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रावर मनसे नेते वसंत मोरे यांनी दिली आहे

Dnyaneshwar Choutmal

Pune News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर मनसे कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र लिहिले आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी बोलणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्र लिहून कान टोचले आहेत. राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रावर मनसे नेते वसंत मोरे यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी काही दिवसांपूर्वी एक पोस्ट सोशल मीडियावर केली होती. त्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. या पोस्टमुळे वसंत मोरे हे नाराज असल्याची चर्चा होती. याचदरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र लिहिलं आहे.

पक्षांतर्गत बाबींवर सोशल मीडियावर लिहिणाऱ्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी चांगलीच तंबी दिली आहे. या पत्राचा मजकूर हा पक्षातील नाराज असलेल्या वसंत मोरे यांना इशारा असल्याचा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या होत्या. राज ठाकरे यांच्या या पत्रानंतर मनसे नेते वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'राज साहेबांच्या आदेशाचे मी तंतोतंत पालन करणार आहे' अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे.

राज ठाकरे यांचे पत्र जसेच्या तसे..

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र,

सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाट्टेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स ह्याच्याने हे सगळे शेफारले आहेत. इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खपवून घेणार नाही.

माझ्या पक्षातल्या कोणालाही, पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्यांशी बोला, माझ्याशी बोला. पण हे सोडून जर थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची आहे ती करा. पक्षात राहून असे प्रकार केलेत, तर हकालपट्टी अटळ आहे हे लक्षात ठेवा.

ही समज नाही तर अंतिम ताकीद आहे ह्याची नोंद घ्या!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डोंबिवली रेल्वे स्थानकातून राजू पाटील शेकडो मनसैनिकांसह ट्रेनने मुंबईकडे रवाना

मोदी सरकारचं गिफ्ट! ५ टक्के व्याजावर ३ लाखांचं कर्ज; काय आहे सरकारची योजना, कोण घेऊ शकतो लाभ?

Gold Price Today : सोन्याच्या दरात सर्वात मोठा बदल; 18, 22 आणि 24 कॅरेट किती रुपयांनी स्वस्त? आताच घ्या जाणून

'दृश्यम' चित्रपट पाहिला, २००० किमी प्रवास केला अन्…; बापाला संपवल्याचा रचला बनाव, पण एका कॉलने सगळा प्लॅन उधळला

BJP: भाजपला मोठा झटका! दिग्गज महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT