Vasant More Saam TV
मुंबई/पुणे

MNS Leader Vasant More : मनसेच्या वसंत मोरेंना का वाटतेय ईडीची भीती? फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं...

Vasant More News : वसंत मोरे यांनी केलेली एक फेसबूक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

प्रविण वाकचौरे

Pune News : वसंत मोरे नाव पुणेकरांना चांगलंच माहित आहे. कदाचित ते पुण्याचे भावी खासदारही असू शकतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्याचे नेते वसंत मोरे नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. कधी पक्षातील नाराजी, तर कधी इतर पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठींमुळे वसंत मोरे राजकीय वर्तुळात नेहमी गप्पाचा विषय असतात. (Pune News)

वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी निमित्त राजकीय नाही. वसंत मोरे यांनी केलेली एक फेसबूक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. वसंत मोरे यांच्या पोस्टरवर त्यांचे समर्थक दणक्यात कमेंटही सोडत आहेत. या पोस्टच्या माध्यमातून वसंत मोरे यांनी केंद्र सरकारला चिमटा काढत आगामी लोकसभा पोटनिवडणुकीबाबतही सूचक विधान केलं आहे. (Political News)

वसंत मोरे यांनी आपल्या ऑडी कारसोबतचे फोटो फेसबूकवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्यांना कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'ऑडी जुनीच आहे फक्त कलर नवीन केलाय. नाहीतर खासदारकीला नाव आलंय उगाच गैरसमजाने गाडी पाहून ईडीवाले यायचे घरी.'

तर 100 टक्के निवडून येईन

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षांना मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मनसेकडून वसंत मोरे यांच्या नावाची लोकसभा पोटनिवडणुकीसाठी चर्चा होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संधी दिल्यास मी लोकसभा निवडणूक 100 टक्के लढवेन आणि जिंकूनही दाखवेल, असा विश्वास वसंत मोरे यांनी व्यक्त केला होता.

माझी पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. आता निवडणूक लागेल न लागेल काही सांगता येत नाही. परंतु माझी तयारी आहे. निवडणूक लागली आणि राज ठाकरे यांनी आदेश दिले तर पुण्याची लोकसभा लढवेल, असं वसंत मोरे यांनी म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT