Sushma Andhare Raj Thackeray  Saamtv
मुंबई/पुणे

MNS News: 'नातवाला राजकारणात ओढाल तर कानाजवळ डीजे वाजवू...' मनसेचा सुषमा अंधारेंना इशारा; प्रकरण काय?

Maharashtra Politics: विरोधाची भाषा, स्तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभेल असा ठेवा... असा इशारा शालिनी ठाकरे यांनी दिला आहे.

Gangappa Pujari

Shalini Thackeray On Sushma Andhare:

नुकत्याच झालेल्या गणपती विसर्जन मिरवणूकीतील डी.जे च्या दणदणाटावर अनेकांनी चिंता व्यक्त केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्वीट करत याबद्दल भाष्य केले होते. राज ठाकरे यांच्या ट्वीटनंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नातवाला त्रास झाला म्हणून बडा नेता बोलेल, असा टोला लगावला होता. यावरुनच मनसे आणि अंधारेंमध्ये चांगलीच जुंपल्यांचे पाहायला मिळत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नातवाचा उल्लेख करत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी टीका केली होती. या टीकेनंतर मनसेनेही आक्रमक भूमिका घेत सुषमा अंधारे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. विनाकारण राज ठाकरेंच्या नातवाचे नाव घ्याल तर कानाखाली डीजे वाजवू.. असा दम मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी दिला आहे.

काय आहे मनसेचा इशारा...

"हिंदू सण उत्साहाने साजरे झालेच पाहिजेत यासाठी राजसाहेबांनी अनेकदा ठाम भूमिका घेतली आहे. मात्र काही हिंदू सणांमध्ये डी. जे. आणि लेझर लाईट मुळे होणारा त्रास याबाबत ही रोखठोक भूमिका घेवून त्यास विरोध केला. महाराष्ट्रातील जनतेने तसेच सर्व पक्षातील संवेदनशील माणसांनी याचे स्वागत केले. हीच बाब बहुदा तुम्हाला रुचली नसल्याचे दिसतेय."

"सध्या मराठीबाबत तांडव सुरू असताना तुमचे शिल्लक सेना प्रमुख आणि त्यांचे बगल बच्चे शांतच आहेत. अशा वेळी फक्त मनसे (MNS) आणि राजसाहेब सडेतोड भूमिका घेताना दिसत आहेत. म्हणुनच राजसाहेबांवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा तुम्ही केविलवाणा प्रयत्न करत आहात..."

कुटुंबाला राजकारणात ओढायची तुमच्या 'गट' प्रमुखांची सवय तशी जुनीच. काही दिवसांपूर्वी तुमच्या 'गट' प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला राजकारणात ओढले होते. मग तुमच्या सारखे चेले - चपाटे तरी कसे मागे राहतील? यातूनच तुमच्या पक्षाची संस्कृती दिसते.

अंधारे बाई, या पुढे याद राखा. संबंध नसताना जर साहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डि.जे. वाजवल्याशिवाय राहणार नाही. ज्या बाबी पटत नसतील त्याला विरोध जरूर करा. मात्र विरोधाची भाषा, स्तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभेल असा ठेवा... असा इशारा शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: मुसळधार पावसाने मुंबईची जीवनवाहिनी ठप्प, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक बंद

Marathwada Rain : मराठवाड्यातील पाण्याची चिंता मिटली; प्रमुख ११ धरणाची शंभरीकडे वाटचाल

Kullu Cloudburst Video: कुल्लूमध्ये ढगफुटी; रस्ते खचले, घरं, दुकानं गेली वाहून

Ladki Bahin Yojana: महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

Thama: खूनी प्रेम कहानी...; आयुष्मान खुराना आणि नवाजुद्दीन सिद्दीकीचा थरार, रश्मिका मंदानाचा ग्लॅमर, 'थामा'चा जबरदस्त टिझर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT