Avinash Jadhav 
मुंबई/पुणे

Avinash Jadhav: खंडणीच्या आरोपानंतर अविनाश जाधवांची पहिली प्रतिक्रिया

Avinash Jadhav: सराफा शैलेश जैन (वय ५५) यांनी मनसे नेते अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्याविरोधात खंडणीची तक्रार केली होती. जैन यांच्या तक्रारीवरून लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आवेश तांदळे

मुंबई: सराफाकडून खंडणी मागितल्या प्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. याप्रकरणी अविनाश जाधव यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिलीय. हा आपल्या विरोधात षडयंत्र रचल्या जात असल्याचा आरोप जाधव यांनी केलाय.

आपल्या नावे खोटी केस करण्यात आलीय. मित्राच्या बायकोला सराफाने डांबून ठेवलं होतं. त्यांची सुटका करण्यासाठी आपण तेथे गेलो असल्याचं अविनाश जाधव यांनी प्रतिक्रियेत म्हटलंय. दरम्यान, सराफा शैलेश जैन (वय ५५) यांनी मनसे नेते अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्याविरोधात खंडणीची तक्रार केली होती. जैन यांच्या तक्रारीवरून लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केलाय.

जैन यांनी वैभव ठक्करला झवेरी बाजार येथील आपल्या कार्यालयात हिशेबासाठी बोलावले होतं. त्यावेळी अविनाश जाधव आणि त्यांचे सहकारी तिथे आले. जाधव यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांसमोर जैन यांचा मुलगा सौमिल याला मारहाण केली. तसेच अविनाश जाधव यांनी जैन यांच्याकडे ५ कोटी रुपयांची खंडणी देखील मागितली असं जैन यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय.

पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिलीय. गेल्या २ ते ३ दिवसांपासून माझ्यावरती खंडणीचे आरोप लावण्यात आले. त्यामध्ये मी मारहाण केल्याचा व्हिडिओ आहे ती प्रसारमाध्यमांमध्ये लावण्यात आले. पण माझ्याविरोधात हे संपूर्णपणे षडयंत्र आहे. एक तारखेला आम्हाला हुतात्मा चौकात कार्यक्रमासाठी राज ठाकरे यांनी बोलवलं होतं. वैभव म्हणून माझा मित्र आहे, त्याने त्या ठिकाणी मला बोलावलं होतं. त्यानंतर मला त्याने सांगितलं की मला आणि माझ्या बायकोला या ठिकाणी डांबून ठेवलं आहे.

स्थानिक पोलीस स्टेशनला मी फोन केला आणि वाघ या इन्स्पेक्टर यांच्याशी मी बोललो. दुकानाच्या आतून मुलीचा आवाज येत होता आणि मी तर सराफच्या मुलाला बोललो की दरवाजा उघड परंतु त्याने उघडला नाही म्हणून त्याला कानाखाली मारली परंतु तो ऐकत नव्हता. आणि त्यातून त्याने मला खंडणीचा गुन्हा दाखल केला. वैभव माझ्याकडे दोन दिवसांपूर्वी आलेला होता. त्याने मला त्याचे पैशाचे व्यवहार सांगितले आणि मदत मागितली. पाच कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा त्यांनी मला सांगितले. त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी मुंबईला गेलो आणि तिथे मला वैभवने त्याची बायको मिळाली. त्याने जे एफआयआरमध्ये लिहिलेलं आहे. परंतु तीच रेकॉर्डिंग माझ्याकडे देखील आहे.

त्या ठिकाणी माझ्यावरती खोटे केस बनवली गेली. जर एखाद्या पुण्यामध्ये जर नाव त्या ठिकाणी टाकला जातो तेव्हा पुरावा हे देखील तपासले जातात तर ते रेकॉर्डिंग देखील नीट ऐकायचे होती. मी नारायण राणे यांच्या प्रचारासाठी कोकणात होतो सिंधुदुर्गात होतो तेव्हा पोलीस घेण्यासाठी कणकवलीपर्यंत आले होते. परंतु त्या मुलीची तक्रार घेतली नाही मुलीला डांबून ठेवलं ती पोलिसांनी तक्रार घेतली नाही. हे प्रकरण आहे ते बनवले आहे. मला जाणीवपूर्वक फसवण्याचं काम या गुन्ह्यामध्ये केलं गेले आहे. खंडणीसारखा पुण्यामध्ये माझं नाव मलीन करण्याचं काम सुरू आहे. माझ्याकडे अनेक पोलीस अधिकाऱ्यांचे रेकॉर्डिंग आहे. डीजीपी यांनी जाणीवपूर्वक माझ्यावरती हा गुन्हा दाखल केलेला आहे. अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT