महाराष्ट्र नवनिर्मण सेने पुन्हा एकदा टोलनाक्याच्या मुद्द्यावरून आक्रमक झाली आहे. याच प्रश्नावर आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे. टोल घेतल्यास सगळे टोलनाके आम्ही जाळून टाकू, असा इशारा त्यांनी दिला. यानंतर राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाक्यांवर आंदोलन केलं.
यातच मनसे नेते अविनाश जाधव यांनीही मुलुंडच्या आनंदनगर टोलनाक्यावर आंदोलन केलं. याप्रकरणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे, असं बोललं जात आहे. त्यांच्यसह १२ मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल या सर्व मनसे कार्यकर्त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी मुलुंडच्या वीर सावरकर रुग्णालयात नेण्यात आले आहे. आजची रात्र मनसे कार्यकर्त्यांना तुरुंगातच काढावी लागू शकते, असं बोललं जात आहे. (Latest Marathi News)
दरम्यान , आज राज ठाकरे पत्रकार परिषद घेऊन म्हणाले आहेत की, ''टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे. याची शहानिशा झाली पाहिजे. याप्रश्नानी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यांच्याकडून काय उत्तर येतंय ते पाहू.''
ते म्हणाले, ''फडणवीसांनी म्हटल्याप्रमाणे कार, चारचाकी, तीनचाकी आणि दुचाकीला टोल नाही आहे. यासाठी आमची माणसं रस्त्यावर उतरतील आणि जिथे टोल घेतला जातोय, तेथे हे थांबवले जाईल. आम्हाला विरोध करण्याचा प्रयत्न केला तर असे टोलनाके आम्ही जाळून टाकू.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.