Amit Thackeray News Saam tv
मुंबई/पुणे

Amit Thackeray News: 'आपण लवकरच सत्तेत असू', मनसे नेते अमित ठाकरे यांचं मोठं वक्तव्य

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनीही सत्तेबद्दल मोठा दावा केला आहे.

Vishal Gangurde

Amit Thackeray News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानंतर आता त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनीही सत्तेबद्दल मोठा दावा केला आहे. 'आपण लवकरच सत्तेत असू, असा दावा अमित ठाकरे यांनी केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते. (Latest Marathi News)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईच्या दादर येथे या ठिकाणी रघुवंशी हॅाल येथे कामगार मेळाव्याचे आयोजित केले. या कामगार मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही उपस्थिती दर्शवली आहे.

या मेळाव्यात राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी सत्तेबद्दल मोठा दावा केला आहे . या मेळाव्यातील उपस्थितांना संबोधित करताना अमित ठाकरे (Amit Thackeray) म्हणाले, ' कधी आपली काम होतात कधी होत नाही. आपण लवकरच सत्तेत असू. त्यामुळे आपली सगळी काम होतील'.

या कामगार मेळाव्यात शर्मिला ठाकरे यांनी उपस्थितांनाही संबोधित केले. या कामगार मेळाव्यात शर्मिला ठाकरे म्हणाले, 'जगभरात कामगार कपात सुरु आहे. तरीही तुमचे काम सुरु आहे. हे काम कठीण आहे. कंपनीचे मालक ऐकण्यापलीकडे गेले आहेत. कायदे बदलत आहेत. तुम्ही प्रवाहाविरुद्ध पोहत आहात. म्हणून मी कौतुक करायला आले आहे'.

'मी फोन करूनही ओरडते. कामगार सेनेची टीम तरुण आहे. इतर संघटनांची टीम साठी पार आहे. इतर लोक कट मिळणार म्हणून काम करतात. आपण तसे करत नाही. सगळीकडे आपण पोहचतोय, कामगारांना न्याय देण्याचे प्रयत्न सुरु ठेवा, असेही शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे सत्तेबद्दल काय म्हणाले होते?

मनसेच्या १७ व्या वर्धापननिमित्त झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरे म्हणाले होते की, 'निवडणुका होत नसल्यामुळे दहावीला नापास नापास झाल्यामुळे वाटते आहे .जेव्हा कधी पालिकांच्या निवडणुका होतील, तेव्हा आपण सत्तेत असणार म्हणजे असणारच, कारण दररोज जे तमाशे सुरु आहेत, त्याला जनता विटली आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT