Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Vetal Tekdi: वेताळ टेकडी वाचवण्यासाठी मनसे सरसावली, लाक्षणिक उपाेषणास प्रारंभ

Pune News Today: गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील वेताळ टेकडीचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे.

Shivani Tichkule

अक्षय बडवे

Pune Vetal Tekdi News: गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील वेताळ टेकडीचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. टेकडी फोडून रस्ता बनवल्या जात असल्याने विविध स्तरातून या प्रकल्पाचा विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील वेताळ टेकडी फोडून होणाऱ्या रस्त्याला मनसेकडून विरोध करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

या विरोधात आज मनसेने (MNS) लाक्षणिक उपोषणाला सुरुवात झाली आहे. यावेळी मनसेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आमचा शहरातील कुठल्याच विकास कामाला विरोध नाही मात्र या कमला आमचा विरोध आहे. पुणेकरांचा श्वास कोंडून आणि फोडून जर प्रकल्प होणार असतील मग आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका मनसेने मांडली आहे. (Pune News)

पुण्यातील वेताळ टेकडी

वेताळ टेकडी ही पुणे शहरातील तील एक महत्त्वाचा डोंगर आहे. पुण्याच्या (Pune) पश्चिमेला वसलेला ही टेकडी जैवविविधता आणि सौंदर्याच्या दृष्टीने पुणेकरांच्या आकर्षणाचे स्थान बनली आहे. पुणे शहराचा सर्वोच्च बिंदू याच टेकडीवर समुद्रसपाटीपासून ८०० मीटर उंचीवर आहे.

वेताळ टेकडीचा विस्तार सुमारे साडेदहा चौरस किमी क्षेत्रात आहे. वेताळ टेकडी हे नाव त्या टेकडीवर असलेल्या वेताळबाबाच्या देवळामुळे आले आहे. या देवळाजवळच वन विभागाने सद्ध्या एक उंच निरिक्षण मनोरा उभारला आहे. एस.एन.डी.टी,ला कॉ्लेज रस्ता, सेनापती बापट रस्ता, गोखले नगर, सिंबायोसीस, पंचवटी, पत्रकार नगर या भागांमधे टेकडीचा विस्तार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Leader: भाजप नेत्याला घेरत जीवघेणा हल्ला, भररस्त्यात संपवलं; आरोपी घटनास्थळावरुन फरार

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

Maharashtra Politics: पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि ही लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत- आशिष शेलार|VIDEO

SCROLL FOR NEXT