Narendra Modi/Shalini Thackeray
Narendra Modi/Shalini Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

देशवासीयांचे कान टोचल्याबद्दल शालीनी ठाकरेंनी मानले मोदींचे आभार; म्हणाल्या, हा भाषिक माज...

Jagdish Patil

रुपाली बडवे -

मुंबई: स्वातंत्र्यदिनानिमित्त काल लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आपल्या भाषणात महिलांविषयी बोलताना भावूक झाले, आम्ही आमच्या दैनंदिन जीवनात महिलांचा अपमान करतो, हे मान्य नसल्याचं मोदी भाषणात म्हणाले होते.

त्यांच्या याच वक्तव्याबाबत महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या (MNS) सरचिटणीस शालीनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी पंतप्रधानांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. आपल्या सोशल मीडियावरती (Social media) ठाकरे यांनी याबाबत एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 'शिव्या द्या, पण मराठीत' हा आपला भाषिक माज बिनबुडाचा आहे.

भांडण असो की चेष्टामस्करी; शिव्या आणि अपशब्दांमधून आया बहिणींचा- महिलांचाच अपमान होतो. भारतीय पुरुषी समाजमनातील या विकृतीमुळे महिलांचे समाजात, अगदी कुटुंबातही खुलेआम खच्चीकरण होत असते.

स्त्री-पुरुष समानतेच्या आजच्या काळात शिव्यांमधून होणारा अपमान सहन करणं महिलांसाठी असह्य आहे. महिलांचा सन्मान करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त काल देशवासीयांना केलेलं आवाहन सर्वांनीच गांभीर्याने घ्यायला हवं. लाल किल्ल्यावरून देशवासीयांचे कान टोचल्याबद्दल पंतप्रधानांचे मनःपूर्वक आभार असं त्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये लिहलं आहे.

पाहा व्हिडीओ -

पंतप्रधान काय म्हणाले होते ?

कालच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणामध्ये पंतप्रधान म्हणाले, 'मला माझी एक व्यथा मांडायची आहे. लाल किल्ल्यावरून तो विषय सांगण्यासारखा नाही हे मला माहीत आहे. मात्र, माझ्या मनातील वेदना कुठे सांगू? कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्यात एक विकृती आली आहे. आपल्या बोलण्यात, चालण्यात, शब्दांद्वारे आपण स्त्रीचा अपमान करतो.

दैनंदिन जीवनात स्त्रियांचा अपमान करणाऱ्या प्रत्येक गोष्टीतून संस्कारातून मुक्ती मिळवण्याची प्रतिज्ञा आपण घेऊ शकतो. महिलांचा गौरव ही राष्ट्राची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मोठी संपत्ती ठरणार आहे शिवाय महिलांचा अपमान आपणाला मान्य नसल्याचं मोदी म्हणाले होते.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुतीचा ५ जागांचा तिढा सुटला? पण नाशिकचा सस्पेन्स कायम

Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

Today's Marathi News Live : आदित्य ठाकरेंचा उद्या श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

Supriya Sule on Onion | कांदा निर्यातीवर सुळे यांचा केंद्र सरकारला सवाल

Vasant More Election symbol : झोप उडवणार! वसंत मोरेंना निवडणूक चिन्ह मिळताच विरोधकांना दिला थेट इशारा

SCROLL FOR NEXT