mns dhol bajaoo andolan saam tv
मुंबई/पुणे

नवी मुंबईत मनसेचं ढोल वाजवा आंदोलन; पालकमंत्र्याच्या मेंदूचा इलाज करु : संदीप देशपांडे

आज नवी मुंबई महापालिकेवर माेर्चा धडकला.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज (शुक्रवार) मनसेने (mns) नवी मुंबई (navi mumbai) महापालिका मुख्यालयावर (navi mumbai muncipal) ढोल वाजवा आंदोलन करण्यात आले. (navi mumbai latest marathi news)

कोविडमुळे (covid19) मृत झालेल्या कंत्राटी कामगारांना पाच लाखांची आर्थिक मदत मिळावी, ६० दिवसांचा कोविड भत्ता मिळावा व कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन लागू करावे या तीन प्रमुख व अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन (andolan) करण्यात आले.

या आंदोलनात मनसे नेते संदीप देशपांडे (mns leader sandip deshpande) व नगरसेवक संतोष धुरी हे देखील सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न मनपा आयुक्तांच्या कानावर पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला असून मनसेला या कामाचे श्रेय भेटू नये म्हणून पालकमंत्र्यांनी मागण्या मान्य न करण्यास सांगितले असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला. पालकमंत्र्यांची अशी मानसिकता असेल तर त्यांच्या मेंदूचा इलाज करावा लागेल आणि तो आम्ही आमच्या पद्धतीने करू मग फिरा दाढी खाजवत असा खोचक टोलाही देशपांडे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदेंना (eknath shinde) लगावला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT