Our Coast Our Responsibility MNS Twitter/@@mnsadhikrut
मुंबई/पुणे

शाब्बास! गणेश विसर्जनानंतर मनसेने स्वच्छ केला समुद्र किनारा; अमित ठाकरेंचा स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग

MNS Beach Cleaning Movement: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज 'आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी' या मोहिमेत सहभाग घेतला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण शिंदे, मुंबई

मुंबई: गणपती विसर्जनानंतर शनिवारी सकाळी मुंबईतील विविध समुद्रकिनाऱ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज 'आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी' या मोहिमेत सहभाग घेतला. अनेक पर्यावरणप्रेमींसह अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी दादर समुद्र किनाऱ्यावर वाळूत रुतलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य उचलून हा किनारा स्वच्छ केला. (MNS Latest News)

याप्रसंगी त्यांच्यासोबत मनसे नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे, पक्षाचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्यासह अनेक पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक तसंच महाविद्यालयीन तरुण-तरुणीसुद्धा समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.

आज, शनिवारी सकाळी मुंबईत गिरगाव, दादर, माहिम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा येथे, रायगड जिल्ह्यात उरण, वर्सोली, नागाव, अलिबाग, मुरुड येथे; तर रत्नागिरीत मांडवी येथे सकाळी ८ ते १० दरम्यान पक्षातर्फे राबवण्यात आलेल्या समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत पक्षाचे पदाधिकारी, असंख्य नागरिक तसंच विद्यार्थी सहभागी झाले. या सर्वांनी गणेश विसर्जनानंतर समुद्राच्या भरती ओहोटीमुळे किनाऱ्यावर आलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य गोळा करून ते स्थानिक प्रशासनाकडे सोपवले.

मुंबई महापालिकेने गणेश विसर्जनादरम्यान व्यवस्था केली होती. समुद्राचे प्रदूषण कमी व्हावे यासाठी ठिकठिकाणी निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती. तर, ठीक ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते. या कृत्रिम तलावांमध्ये घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT