Raj Thackeray joins Pune MPSC students protest and extends support saam tv
मुंबई/पुणे

पेपरफुटी, खासगीकरण, आरक्षण; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राज ठाकरे काय म्हणाले?

Raj Thackeray Meets MPSC Aspirants In Pune: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट देत पाठिंबा दिला. महाराष्ट्रातील युवकांना रोजगार आणि नोकरीला प्राधान्य देण्याची मागणीही त्यांनी केलीय.

Bharat Jadhav

  • पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट देत पाठिंबा दर्शवला.

  • आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणीही विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

  • राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील युवकांना रोजगार आणि नोकरीच्या संधींना प्राधान्य देण्याची मागणी केली.

पुण्यात गेल्या पाच दिवसापांसून MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आता राजकीय रंग घेतला असून आता या आंदोलनात अनेक लोकप्रतिनिधी हजेरी लावत आपला पाठिंबा जाहीर करत आहेत. मत चोरीच्या प्रकरणावरून मोदी सरकारला खडेबोल सुनावणारे महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हेही मैदानात उतरले असून त्यांनी आज संध्याकाळी पुण्यातील आंदोलनस्थळी जात विद्यार्थ्यंची भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा देत सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.

त्याचबरोबर राज ठाकरेंनी राज्यातील युवकांना रोजगार, नोकरी प्राधान्याने द्यावी अशी मागणी केलीय. पुण्यातील गरवारे पुलावर विद्यार्थ्यांचे आंदोलन गेल्या पाच दिवसांपासून चालू आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन चालू आहे. MPSC अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विद्यार्थीची आहे. दरम्यान आज राज ठाकरेंनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली.

आंदोलनास्थळी जाताच राज ठाकरेंनी थेट केंद्र सरकारसह राज्य सरकारवर हल्लाबोल केला. राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांना पाठिंबा देताना त्यांना वस्तुस्थिती समजून घ्या, असा सल्ला दिला. कारण देशात फक्त एका बाजुने मन की बात चालू आहे. सरकारला जनतेचं ऐकू येत नाहीये. कोणतेही सरकार आले तरी तुमची मागणी पूर्ण होणार नसल्याचं म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर उपरोधिक टीका केली. ज्याप्रमाणे परीक्षेचे पेपर फुटतात त्याचप्रमाणे आमच्याकडे मतं फुटलं जातात. अनेक विद्यार्थी कर्ज काढून परीक्षेची वर्षांनुवर्षे तयारी करतात. आमचे मते फुटली की आमचेही पाच-पाच वर्ष निघून जातात, त्यामुळे मी विद्यार्थ्यांची वेदना समजू शकतो.

विद्यार्थ्यांना आपला लढा कायम ठेवण्याची सल्ला देताना राज ठाकरे म्हणाले की, मी जे बोलतो सत्य बोलतो आणि कडवट असते. तरुणांनी जातीपातीमध्ये अडकू नये. युवकांना नोकरी मिळाल्या पाहिजेत.आरक्षणाची मागणी केली जातेय, परंतु सरकारी नाहीयेत. आरक्षणासाठी सरकारी नोकऱ्या आहेत कुठे? दरम्यान सरकार आपल्याला युवकांना जातीपातीमध्ये अडकवून ठेवत आहे जेणेकरून मुळ प्रश्नांकडे जनतेचं लक्ष जावू नये. सरकारनं जाहीर केलेल्या ७० हजार पदेही भरली जाणार नाहीत. सर्व सरकारी नोकरी खासगी होत आहेत.प्रत्येक संस्था ह्या खासगी केल्या जात आहेत. सर्व सरकारी नोकऱ्या खासगी होतायत.

रोजगार आणि अदानींवरून सरकारवर हल्लाबोल

देशासह राज्यातील अनेक कंत्राट हा गौतम अदानी यांना दिली जात आहेत. माध्यमांपासून ते अनेक मोठं मोठ्या सरकारी संस्था अदानींकडे सोपवल्या जातात. दिसली जमीन की अदानींना दिली जाते. दिसला पोर्ट की अदानींना दिला जातो असा टीका राज ठाकरेंनी यावेळी केली. सर्व क्षेत्र खासगीकरण करण्यात येत आहेत. सरकारकडून सरकारी नोकरी घाला घातला जात असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: कोणत्या राशींचा दिवस खास? धनु, मकर, कुंभसह या राशींना मिळणार आनंदाची बातमी

Maharashtra News Live Update: हिंगोली शहरातील फटाक्याच्या गोदामाला भीषण आग

असे गुरुजी प्रत्येक शाळेत हवेत, विद्यार्थ्यांसाठी गुरुजींचा 'हेअर कटिंग पॅटर्न'

निवडणूक आयोगाविरोधात न्यायमूर्ती मैदानात, 'SIRमुळे लोकशाहीवर मोठं संकट'

लालचुटूक बीट खाण्याचे १० अद्भूत फायदे, मोजक्याच लोकांना माहीत असतील

SCROLL FOR NEXT