सागर आव्हाड, साम प्रतिनिधी
वाहतुक कोंडीची समस्या नेहमीचीच झालीय. ट्रॉफिकमुळे वाहनधारकांना तासन्-तास एकाच जागी थांबून रहावे लागते. झालीय. त्यात जर एखाद्या नेत्याचा दौरा असला तर सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना सुद्धा वाहतूक कोंडीचा फटका बसलाय. अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी ते २५ मिनिटांनी पोहोचलेत.
आज मनसे प्रमुख राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी ते मोर्चोबांधणी करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आलेत. मात्र यावेळी त्यांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागले. सोन्या मारुती चौकापासून ते फडके चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पाच मिनिटाच्या अंतरासाठी राज ठाकरेंना २५ मिनिटे कारमध्ये ताटकळत रहावे लागले.
मनसे कार्यकर्ते प्रल्हाद गवळी यांच्याकडून पुण्यात गणपती तुमचा किंमतही तुमचीच हा कार्यक्रम दरवर्षी राबवला जातो. आवडलेल्या गणपती मूर्ती सांगायच्या आणि किंमतही स्वतः ठरवायचे असे या उपक्रमाचा कार्य आहे. या उपक्रमाचा शुभारंभ राज ठाकरेंच्या हस्ते होणार होता, त्या कार्यक्रमासाठी राज ठाकरे जात होते, त्यावेळी त्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.