Raj Thackeray Saam Digital
मुंबई/पुणे

Raj Thackeray: 'ताकदीने लढणार, मनसे यंदा सत्तेत येणार..', राज ठाकरेंना विश्वास; निवडणुका जाहीर होताच केली मोठी घोषणा!

Maharashtra Assembly Election 2024: पक्षाचा जाहीरनामाही लवकरच येईल. सर्व राजकीय पक्षांपेक्षा जास्तीत जास्त जागा आम्ही लढणार आहोत," अशी मोठी घोषणाही राज ठाकरे यांनी यावेळी केली.

Gangappa Pujari

सचिन गाड, मुंबई

Raj Thackeray On Assembly Election 2024: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. काल निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महायुती, महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची लगबग सुरु असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

आज पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे नेत्यांची बैठक पार पडली. अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अभिजीत पानसरे, शिरीष सावंत, अविनाश जाधव आणि राजू पाटील आदी नेते यावेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांवरुन महत्वाची घोषणा केली.

काय म्हणाले राज ठाकरे?

"महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा लढवणार आहे. जोरात लढवणार आहे. माझ्या सभेत मी बोललो ते सहज नाही बोललो. सहकार्यांना उत्साह यावा म्हणून बोललो नाही. विधानसभा निवडणूका आम्ही जिंकू आणि सत्ता आणू. माझी भूमिका मी मांडली आहे. पक्षाचा जाहीरनामाही लवकरच येईल. सर्व राजकीय पक्षांपेक्षा जास्तीत जास्त जागा आम्ही लढणार आहोत," अशी मोठी घोषणाही राज ठाकरे यांनी यावेळी केली.

"टोलमाफी व्हावी ही आमचीच मागणी होती. काँग्रेसचे सरकार होते, तेव्हापासून आम्ही ही मागणी करत होतो. आपली फसवणूक होत आहे, हे लोकांना वाटत होते. या निर्णयाबद्दल मी सरकारचे आभार मानेन. अनेकांनी टोल नाके बंद करू म्हणून शब्द दिले. मात्र निवडणूकीच्या तोंडावर हे झालेले आहे. मत पाहिजे म्हणून टोल बंद केले, असं होणार नाही असं होऊ देणार नाही. राज ठाकरेंनी एखादं आंदोलन पुढे नेले की असंच होणार आहे. आता सगळे श्रेय लाटायला येतील," असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.

दरम्यान, टोलमाफीचा निर्णय झाला याचे समाधान आहे, मात्र पैसे कुठून येतात समजत नाही. सरकारकडे आज पैसे नाहीत. तुम्ही वाटा वाटी करत आहात. अशाने राज्य कंगाल होईल. दरम्यान, निवडणूक लढवायच्या म्हणून आम्ही लढवणार नाही. राज्यात सर्वात जास्त जागा मनसे लढेल. आमचे दौरेही आता सुरु होतील, असे राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shakun Shastra: घरात तुमच्या हातून या ५ गोष्टी पडणं मानलं जातं अशुभ; भविष्यातील घटनांचे मिळतात संकेत

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये धावत्या टिप्परला लागली आग

Madhavi Nimkar: चाळीशीतल्या माधवी निमकरचं आरस्पानी सौंदर्य, फोटो पाहून काळीज धडधडलं...

Pudina Chutney Recipe: उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवणारी पुदीना चटणी कशी बनवायची?

Blood Pressure : झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवण कराच, BP अन् आणि शुगर राहील कंट्रोलमध्ये; नव्या संशोधनातून महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT