Sanjay Raut : शिवसेनेला कोणाचाही फटका बसत नाही शिवसेना फटके देते...; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना सावधगिरीचा इशारा

संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, नाशिकवर भगवा झेंडाच राहणार.
Sanjay Raut Tweet
Sanjay Raut Tweetsaam tv
Published On

Sanjay Raut : शिवसेनेला कोणाचाही फटका बसत नाही शिवसेना फटके देते, असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. नाशिकमध्ये भगवाच फडकणार भगवा कुणीही खांद्यावर घेऊ शकतो, असं देखील संजय राऊत यांनी ठामपणे सांगितलं आहे. खासदार संजय राऊत मंगळवारपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राऊतांनी नाशिकमध्ये झालेल्या बैठकीवर देखील भाष्य केलं. (Latest Sanjay Raut News)

काय म्हणाले संजय राऊत?

मंगळवारी नाशकात भाजपची एक बैठक पार पडली. या बैठकीत गिरीश महाजन यांनी ७० प्लस मतांची घोषणा केली आहे. त्यामुळे याचा ठाकरे गटाला फटका बसण्याची चर्चा सुरू आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले, नाशिकवर भगवा झेंडाच राहणार. भगवा कोणीही खांद्यावर घेऊ शकतो. शिवसेनेला कोणाचाही फटका बसत नाही शिवसेना फटके देते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या आरोपांचा देखील राऊतांनी चांगलाच समाचार घेतला "आम्ही वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजतो असं फडणवीस म्हणत होते. सध्या ते क्रेंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून धाड टाकतायत. तुमच्या पक्षातले जे बँकांना लुटतात त्यांना क्लिन चीट देतात. आमचे फोन टॅप करणारे यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले जातात. "

'स्वत: विषयी चौकशीचा प्रश्न आला तर म्हणायचं मला अटक करणार. राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याला कोणी अटक करतं का? महाविकास आघाडीचं सरकार चांगलं होतं. आम्ही आणि उद्धवजी असं काहीच करणार नव्हते. तुमच्याकडे जबाब घ्यायलाही जायचं नाही का?", असं संजय राऊत म्हणाले.

'आम्ही काल लढलोय, आज लढतोय आणि उद्याही लढू, असं भाष्य संजय राऊत यांनी केलं आहे.

वाघाच्या जबड्यात हात घालतात मग, अटकेची भीती का वाटते?

' तो काळ त्यांच्या नैराश्याचा होता. त्यामुळे त्यांना वाटत होतं मला अटक करावी. उद्धव ठाकेर सुसंस्कृत मुख्यमंत्री होते. त्यामुळे तसं काही घडलं नाही. पैशांचा असा बेकार वापर आजवर पाहिला नव्हता. हे लोक फक्त माणसं विकत घेतात. नगरसेवक, आमदार, खासदार यांचा रेट कार्ड लावला आहे. तसेच कमिशन एजंट नेमलेत ते गावात फिरुन लोकं जमा करतायत. ही सत्तेतल्या लोकांची परिस्थीती आहे.', असंही राऊत पुढे म्हणाले.

शिवजयंतीच्या मुहूर्तावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिवनेरीला जाणार आहेत. त्यामुळे राऊतांनी त्याच्यावर देखील टीका केली आहे. " ते कुठेही गेले तरी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद लाभणार नाही. ज्या राज्यपालांनी शेवटपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर टीका केली त्यांना तुम्ही अभय दिलं. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रातील जनता पाठिंबा देणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com