mns andolan at navi mumbai muncipal corporation demanding books for ssc students Saam Digital
मुंबई/पुणे

Navi Mumbai MNS : आज प्रश्न सुटणारच? नवी मुंबई महापालिका कार्यालयासमाेर मनसेचा ठिय्या (पाहा व्हिडिओ)

mns andolan at navi mumbai muncipal corporation demanding books for ssc students: श्रीमंत महापालिका अशी ओळख असताना देखील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याचा खेळ मांडल्याचा आराेप मनसेने केला.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

गेल्या तीन महिन्यांपासून शाळा सुरु हाेऊन देखील अद्याप दहावीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके न दिल्याने आज (साेमवार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नवी मुंबई महापालिका कार्यालयासमाेर ठिय्या आंदाेलन छेडले. यावेळी मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सुरक्षा रक्षक यांच्यात शाब्दिक चकमक देखील उडाली.

नवी मुंबई मनसे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांच्या प्रश्नांवर आक्रमक झाल्याचे पाहयला मिळाले. मनसेतर्फे नवी मुंबई मनपा मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन करत महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

या आंदाेलनात मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह दहावीचे विद्यार्थी आणि पालकांनी देखील सहभाग नोंदविला. गेल्या 3 महिन्यांपासून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिले गेली नाहीत. जाेपर्यंत पाठ्यपुस्तके दिली जात नाहीत ताेपर्यंत ठिय्या आंदाेलन सुरुच ठेवणार असा इशारा उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांनी दिला. या आंदाेलनात मनसेच्या महिला कार्यकर्त्या देखील माेठ्या संख्येने सहभागी झाल्या हाेत्या. हा प्रश्न तात्काळ न सोडविल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देखील आंदाेलकांनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT