MNS Amit Thackeray Latest News
MNS Amit Thackeray Latest News Twitter/@mnsadhikrut
मुंबई/पुणे

MNS : अमित ठाकरे इन अॅक्शन मोड; तरुणाईला साद घालण्यासाठी मनविसेचे अनेक युनिट सक्रिय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे

मुंबई: राज्यातल्या तरुणाईला आकर्षित करण्यासाठी मनसे (MNS) नेते अमित ठाकरे यांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी राज्यातल्या तरुणाईला आकर्षित करण्यासाठी आठवड्याभरात मनसे विद्यार्थी सेनेचे १०० युनिट स्थापन करणार असल्याची घोषणा केली होती. तर राज्यभरात ५०० युनिट स्थापन करून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तरुणांचा मोठा वर्ग आपल्याकडे करुन 'अमितछाप' सोडण्याचा प्रयत्न करत आहे. पहिल्या टप्यात ६६ युनिट स्थापन करणार असून मुंबईतील विविध महाविद्यालयात हे युनिट स्थापन करण्यात येत आहे. आज १ ऑगस्ट हा मनविसेचा १६ वा वर्धापन दिन असल्याच्या निमित्ताने १ ते ७ ऑगस्ट दरम्यान मनविसे युनिट उदघाटन सप्ताह राबवण्यात येत आहे. (MNS Amit Thackeray Latest News)

हे देखील पाहा -

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी आज, सोमवारी मुंबईतील विविध महाविद्यालयांत मनविसे युनिटची स्थापना आणि युनिट फलक अनावरण केले. अमित राज ठाकरे यांनी मनविसेची सूत्रे हाती घेतल्यानंतर मनसेच्या तरुण फळीत नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. गेल्या दोन महिन्यात अमित ठाकरे यांनी मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघात आणि त्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांत तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या, तसेच मनविसेत अनेक नवीन चेहऱ्यांना पुढे येण्याची संधी दिली जात आहे.

अमित ठाकरे यांनी आज सिद्धार्थ महाविद्यालय - आनंद भवन आणि बुद्धभवन, भवन्स महाविद्यालय, लाला लजपतराय महाविद्यालय, किर्ती महाविद्यालय, रुपारेल महाविद्यालय, रुईया महाविद्यालय, पोदार महाविद्यालय, आचार्य महाविद्यालय, नारायण गुरू महाविद्यालय, पुणे विद्यार्थी गृह महाविद्यालय, डी. ए. व्ही. महाविद्यालय, श्री राम महाविद्यालय, केळकर वझे महाविद्यालय या १४ महाविद्यालयांना भेट दिली आणि युनिट फलक अनावरण केले.

या सर्वच महाविद्यालयांत अमित ठाकरे यांना भेटण्यासाठी तसंच त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी यांची झुंबड उडाल्याचे चित्र पहायला मिळाले. अनेक महाविद्यालयांत अमित ठाकरे यांनी मुख्याध्यापक तसंच विश्वस्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. राज्याच्या राजकारणात सक्रिय होऊ पाहणारे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे सध्या संघटनात्मक बांधणीवर जास्त लक्षं देतायत. त्यासाठी ते राज्यातील अनेक भागांत फिरतायत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या महासंपर्कअभियानासाठी ते मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

अमित ठाकरे मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या बांधणीवर विशेष लक्ष देत आहेत. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा फायदा पक्षाला कसा होऊ शकेल यावर लक्ष केंद्रीत करत तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी मनसेचा गनिमीकावा सुरु आहे. त्यानुसार ते मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत त्यांना मार्गदर्शन करत आहेत. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काही काळ विश्रांतीचा सल्ला दिला होता. राज ठाकरेंची प्रकृती आता उत्तम असून तेही पक्षाच्या कार्यक्रमांत सक्रिय होत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : शिरुर लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह

Women Rights At Workplace: ऑफिसमध्ये महिलांवर अन्याय होतोय? या कायद्यांच्या मदतीने करु शकता तक्रार

Kolhapur News: कळंबा कारागृहात तब्बल ७५ कैद्यांकडे मोबाईल सापडले; तुरुंग अधिकाऱ्यांसह ९ पोलीस निलंबित

Navi Mumbai Crime : नवी मुंबईतून 11 नायजेरियन व्यक्तींना अटक; 16 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

Bus Truck Accident At Rahud Ghat: मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात; बसचा टायर फुटून ६ जण दगावल्याची भीती

SCROLL FOR NEXT