पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अभिजीत बिचुकले यांना केवळ १९ मते
मतमोजणीदरम्यान एकूण ३० उमेदवारांपैकी १९ उमेदवार बाद
कौस्तुभ गावडे यांना १७,६०० मते मिळाल्याची माहिती
अभिजीत बिचुकले यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातूनही निवडणूक लढवली
विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी सुरू असलेली मतमोजणी अद्याप पूर्ण झालेली नाही. तब्बल २२ तासांपासून मतमोजणी सुरू असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. नेहमी आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांना पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. त्यांना या निवडणुकीत केवळ १९ मते मिळाली आहेत. त्यामुळे आता बिचुकलेंना हार मानावी लागणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
शिक्षक मतदारसंघात एकूण ३० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतमोजणीदरम्यान १९ उमेदवार बाद झाले असून, त्यामध्ये बिचुकले यांचाही समावेश आहे. या निवडणुकीत कौस्तुभ गावडे यांना १७ हजार ६०० मते, सचिन सानप यांना ११ हजार ३२८ मते, तर दत्तात्रय सावंत यांना १० हजार ३७७ मते मिळाली आहेत. जयंत आसगावकर यांना ८ हजार ३५० मते मिळाली आहेत. शिक्षक मतदारसंघासाठी विजयाचा कोटा २५ हजार ७५६ निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे अंतिम निकालासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दरम्यान, अभिजीत बिचुकले यांनी पुणे शिक्षक मतदारसंघासोबतच पुणे पदवीधर मतदारसंघातूनही निवडणूक लढवली आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातून बाद झाल्यानंतर आता पदवीधर मतदारसंघात त्यांना किती मते मिळतात, याकडेही लक्ष लागले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात पहिल्या फेरीतील आकडेवारीनुसार हर्षदा जाधव यांना १ लाख १२ हजार ४०० मते, तर स्मित जाधव यांना १ लाख २ हजार मते मिळाली आहेत.
या मतदारसंघातील विजयाचा कोटा १ लाख १३ हजार ११३ आहे. हर्षदा जाधव यांना विजयाचा कोटा पूर्ण करण्यासाठी आणखी ७१६ मतांची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे. पाच जागांच्या निकालासाठी मतमोजणी सुरू असल्याने अंतिम निकाल जाहीर होण्यासाठी आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही तासांत कोण बाजी मारणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.