mla sangram jagtap questions nagar police on increasing crime percentage Saam tv
मुंबई/पुणे

Mla Sangram Jagtap: आमदार संग्राम जगताप मंगळवारी बसणार उपाेषणास, प्रशासनास दिला इशारा; जाणून घ्या कारण

शहरवासियांमध्ये पाेलीस दलाविषयी तीव्र नाराजी पसरली आहे.

Siddharth Latkar

- सुशिल थाेरात

Nagar News :

नगर शहरातील गुन्हेगारीवर आळा बसविण्यात पाेलीस दल कमी पडत असल्याचा दावा करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप (mla sangram jagtap) यांनी प्रशासनास उपाेषणाचा इशारा दिला आहे. जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना दिलेल्या निवेदनात शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडल्यामुळे आणि व्यापाऱ्यांना संरक्षण मिळत नसल्याची खंत आमदार जगताप यांनी व्यक्त केली आहे. (Maharashtra News)

अहमदनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून व्यापाऱ्यांना लुटण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. यामुळे शहरातील व्यापारी भयभीत झाले आहेत. या चोऱ्यांचा तपास ही अद्यापही लागत नसल्याने शहरवासियांमध्ये पाेलीस दलाविषयी तीव्र नाराजी पसरली आहे.

अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना लुटण्याच्या आणि मारहाण करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आलेली आहेत मात्र तरी आरोपी मोकाट फिरत असून या आरोपींना अभय कोण देते हा प्रश्न आता प्रामुख्याने समोर येऊ लागला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे अनेक व्यापारी भयभीत अवस्थेत आहेत. पोलीस प्रशासनाने गुंड आणि चोरट्यांवर कारवाई करावी व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करावे अशा विविध मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांनी २८ नोव्हेंबर पासून (nagar) बाजारपेठेतच उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

Chhagan Bhujbal Net Worth: संपत्तीत ८२ लाखांची वाढ, डोक्यावर ४४ लाखांचे कर्ज; छगन भुजबळांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT