Rohit Pawar on Santosh Bangar video  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: आमदार संतोष बांगर 'त्या' व्हिडीओमुळे गोत्यात येणार? रोहित पवारांनी केली मोठी मागणी

Santosh Bangar VIDEO: आमदार रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून संतोष बांगर यांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Satish Daud

Rohit Pawar on Santosh Bangar video

लोकसभा २०२४ निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. पुढील महिन्यात आचारसहिंता लागून होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेता राजकीय पक्षाचे नेते तसेच जोमाने कामाला लागले असून मतदारांसोबत संवाद साधत आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या व्हिडीओत संतोष बांगर शाळेतील विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व सांगत आहे. इतकंच नाही, तर आई-वडिलांनी मला मतदान केलं नाही तर तुम्ही दोन दिवस उपाशी राहा, असं देखील बांगर शाळकरी विद्यार्थ्यांना सांगत आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

काय म्हणाले रोहित पवार?

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून संतोष बांगर यांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. "यांना मतदान करण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दोन दिवस जेवायचं नाही म्हणजे हे काय महात्मा आहेत का?", असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

"यांनी लहान मुलांच्या शिक्षणासाठी मतदारसंघात काय दिवे लावले? लहान मुलांचा राजकारणासाठी वापर करणं हा गुन्हा असून याबद्दल या आमदार महाशयांवर कारवाई झाली पाहिजे", अशी मागणी देखील रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमधून केली आहे. त्यामुळे बांगर यांच्यावर काय कारवाई होणार? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

काही दिवसांपूर्वी संतोष बांगर यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, तसे न झाल्यास मी भरचौकात फाशी घेईल, असा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता, शाळेतील मुलांसोबत निवडणूक आणि मतदानावर चर्चा करतानाचा त्यांचा व्हिडिओ समोर आल्याने बांगर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

SCROLL FOR NEXT