Rohit Pawar, Kangana Ranaut, Annabhau Sathe
Rohit Pawar, Kangana Ranaut, Annabhau Sathe Saam TV
मुंबई/पुणे

'मैने'ला पद्म पुरस्कार..अण्णाभाऊ मात्र दुर्लक्षित; रोहित पवारांनी साधला निशाणा

साम टिव्ही ब्युरो

पुणे : लोकशाहिर अण्णभाऊ साठेंना (Annabhau Sathe) महापुरुषांच्या यादीत सामविष्ट करण्याची मागणी होत आहे. राज्यातील अनेक लोकांनी, नेत्यांनी अण्णभाऊ साठेंचं नाव महापुरुषांच्या यादीत टाकावं म्हणून विनंती केली आहे. परंतु केंद्र सरकारने त्याला विरोध केला आहे, त्यावरुन नवा वाद निर्माण झाला होता. आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही अण्णभाऊंचे नाव महापुरुषांच्या यादीत टाकण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. त्याचबरोबर त्यांनी 'मैने'ला पद्म पुरस्कार देणाऱ्यांसाठी अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठित नाहीत का? म्हणत कंगणा राणावत वर टीका केली. (Rohit Pawar Latest News In Marathi)

नकली घोड्यावर बसून सामाजिक दुहीचा सूर आळवणाऱ्या 'मैने'ला पद्म पुरस्कार दिला जातो, पण ‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतीया काह्यली’ या लावणीतून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राण फुंकणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मात्र केंद्र सरकारच्या दृष्टीने 'प्रतिष्ठित' नाहीत. कथा, लोकवाङमय, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, गण, गवळण, प्रवास वर्णन अशी विपुल साहित्य सेवा केलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबाबतीतील चुकीच्या शोधाची दुरुस्ती करुन त्यांचा समावेश महापुरुषांच्या यादीत करावा, अशी विनंती फेसबुक पोस्ट लिहीत विनंती रोहित पवार यांनी केंद्र सरकारकडे (Central Government) केली आहे.

दरम्यान काल केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीही याची दखल घेत अण्णभाऊंचे नाव महापुरुषांच्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. एका वृत्तवाहिनिशी बोलताना त्यांनी थेट संबंधीत विभागाला फोन करुन याची दखल घेण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर त्यांनी आश्वासन देखील दिले होते. साम टीव्हीनेही हा मुद्दा कालपासून उचलून धरला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kesar Benefits : केसरचे आरोग्यासाठी भन्नाट फायदे

Dindori Lok Sabha Election | दिंडोरीत शरद पवार गटाची मोठी खेळी; J P Gavit यांची लोकसभेतून माघार

Today's Marathi News Live : मोदी देशाची अर्थव्यवस्था पहिल्या ३ अर्थ व्यवस्थेच्या क्रमांकावर आणणार- देवेंद्र फडणवीस

Exercise Tips: व्यायाम करण्याचा कंटाळा येतोय? या पद्धतीने करा व्यायाम,दिवसभर राहाल फ्रेश

Hemant Dhome News : "साहेब आपली क्षमता आणि चिकाटी आम्हा तरूणांना..."; हेमंत ढोमेची शरद पवारांसाठीची पोस्ट चर्चेत

SCROLL FOR NEXT