Mla Pankaja Munde, Mla Monika Rajale saam tv
मुंबई/पुणे

Pathardi News : ठरलं तर... पंकजा मुंडेंच्या निर्णयास आमदार माेनिका राजळेंचा पाठिंबा

या बैठकीत संप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Siddharth Latkar

- सुशील थोरात

Nagar News : ऊसतोड मजूर,मुकादम व वाहतूक संघटना यांच्या दरात वाढ करावी या मागणीसाठी माजी मंत्री पंकजा मुंडे (pankaja munde) यांच्या नेतृत्वाखाली मागण्यांची सरकारकडून पूर्णता होईपर्यंत संप करण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार मोनिका राजळे (mla monika rajale) यांच्या व्हाईट हाऊस संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत राजळे यांनी देखील या संपाला सहमती दर्शवत पाठिंबा जाहीर केला आहे. (Maharashtra News)

या मागण्याविषयी ३० सप्टेंबरला आमदार मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत संप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पाथर्डी तालुक्यात जवळपास पन्नास हजार ऊसतोड मजूर असून त्यांचाही या संपाला पाठिंबा मिळावा म्हणून आमदार माेनिका राजळे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. ऊसतोड कामगार संघटनेच्या मागण्यावरून येत्या काळात साखर संघ व मुंडे यांच्यात संघर्ष होणार असल्याचे मानले जात आहे.

तीन वर्षांपूर्वी झालेल्या साखरसंघ व ऊसतोड मजूर संघटना यांच्यात वेतनवाढीचा करार झाला होता. त्यानंतर महागाई वाढूनही वेतनवाढ मिळत नसल्याने चालू हंगामात संप करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यास आमदार माेनिका राजळे यांनी पाठींबा दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टात केले हजर

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

SCROLL FOR NEXT