Laxman Jagtap News, Rajya Sabha Election 2022 News, Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Rajya Sabha Election: मतदानासाठी आमदार लक्ष्मण जगताप आजारी असल्याने अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईत येणार

सकाळी आठ वाजता पिंपरी-चिंचवड वरून मुंबईकडे निघाल्यानंतर, जवळपास बारा वाजता दरम्यान लक्ष्मण जगताप हे मंत्रालयात पोहोचणार आहेत.

गोपाळ मोटघरे

पुणे - चिंचवड विधानसभा क्षेत्राचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) हे अतिशय आजारी असल्याने, ते आज होणाऱ्या राज्यसभा निवडणुकांच्या मतदानासाठी मुंबईला (Mumbai) जातील का? लक्ष्मण जगताप हे मुंबईच्या दिशेने एअर ॲम्बुलन्सने किंवा फोर व्हिलर ॲम्बुलन्सने मुंबई कडे सकाळी किती वाजता जाणार? या विषयी काल रात्री उशिरा पर्यंत सभ्रम कायम होतं. (Rajya Sabha Election 2022 News)

हे देखील पाहा -

मात्र, आता लक्ष्मण जगताप यांच्या मुंबईकडे जाणाऱ्या प्रवासा विषयी खात्रीशीर माहिती समोर आली आहे. लक्ष्मण जगताप हे त्यांच्या खासगी चार चाकी वाहन आणि एका कार्डियाक ॲम्बुलन्स सोबत मुंबई कडे सकाळी आठ वाजता निघाले आहेत. यावेळी लक्ष्मण जगताप यांच्या सोबत त्यांचे निकटवर्तीय आणि एक डॉक्टरांचा पथक यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून असणार आहे. सकाळी आठ वाजता पिंपरी-चिंचवड वरून मुंबईकडे निघाल्यानंतर, जवळपास बारा वाजता दरम्यान लक्ष्मण जगताप हे मंत्रालयात पोहोचणार आहेत. आमदार जगताप हे गेल्या २ महिन्यांपासून आजारी आहेत. (Laxman Jagtap News)

राज्यसभेच्या सहा जागांसाठी रणसंग्राम; कोण मारणार बाजी?

राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) सहा जागांसाठी आज मतदान होणार आहे. २४ वर्षानंतर राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीत अशा प्रकारे मतदान होत असल्याने कमालीची चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत घोडेबाजार होणार असा आरोप सत्ताधाऱ्यांसह ( विरोधकांनी एकमेकांवर केला होता. त्यामुळे प्रत्येकाने आपआपले आमदार एका सुरक्षित ठिकाणी ठेवले होते. दरम्यान, या निवडणुकीत नेमका कोणता पक्ष बाजी मारणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूर शहर काँग्रेसमध्ये १२ वर्षांनंतर नेतृत्व बदलाचे संकेत

Ashok Kharat: पतीचा मृत्यू अटळ आहे, भीती दाखवून महिलांचं लैंगिक शोषण; खरातविरोधात आणखी ११ महिलांची तक्रार

Skymet Weather : स्कायमेटनं वाढवलं शेतकऱ्यांचं टेन्शन, यंदा मान्सून दडी मारणार, अहवालात काय आहे?

Morning Yoga Poses: सकाळी हे 5 योगा प्रकार केल्याने शरीर राहील फिट

Ambedkar Jayanti 2026 : शिका, संघटित व्हा, संघर्ष करा! भीम जयंतीनिमित्त 'हे' प्रभावी भाषण नक्की करा; टाळ्यांचा कडकडाट होईल

SCROLL FOR NEXT