Ashish Shelar SaamTv
मुंबई/पुणे

Ashish Shelar: चला"मोतीसाबण" काढायची वेळ झाली!; आशिष शेलार यांची उध्दव ठाकरेंवर टीका

गटाराचे दुषीत पाणी प्रक्रिया न करता समुद्रात जात असताना जे "टेंडरच्या लाटा" मोजत होते असही यात म्हटले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई: मुंबई महापालिकेची निवडणूक (Election) जसजशी जवळ येत आहे तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते वातावरण कृती आराखडा सादर केला. यावर आता भाजप (BJP) नेते आमदार आशिष शेलार यांनी ट्विट (Tweet) करुन शिवसेनेवर (Shivsena) टीका केली आहे.

''मुंबईतील गटाराचे दुषीत पाणी प्रक्रिया न करता समुद्रात जात असताना गेली 25 वर्षे जे "टेंडरच्या लाटा" मोजत होते, देवनारला कचऱ्याचे ढिगारे आकाशाला पोहचेपर्यंत जे कंत्राटदारांची मर्जी सांभाळत होते''.

धारावी सारख्या ठिकाणी प्रदूषणाचे धूर निघत असताना जे भाषणांचे धूर सोडत होते. प्रदूषण कमी करणाऱ्या मेट्रोला विरोध करीत होते, ते कोस्टल रोडचा खेळखंडोबा करु पाहत होते, बिल्डरांना झाडे तोडण्यासाठी रेड कार्पोरेट घालत होते. मुंबईच्या उध्वस्त खाड्या यांच्या दिमतीला SUV गाड्या! चला चला निवडणूक आली पर्यावरण रक्षणाच्या आराखड्यांचे "मोतीसाबण" काढायची वेळ झाली!, अशी टीका आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आलेल्या नोटीसी विरोधात काल भाजपने (BJP नोटीस पेटवून होळी आंदोलन केले. काल देवेंद्र फडणवीस यांची पोलीस बदली घोटाळ्याची गोपनीय माहितीच्या प्रकरणी पोलिसांनी घरी जावून चौकशी केले. याचा भाजपने (BJP) तीव्र निषेध केला.

Edited by -Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मीठमुंबरी-बागवाडी जेटीवरील बोटिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Shraddha Dubey: मॉडेलिंगच्या नावाखाली काळा धंदा! ब्लॉगरच्या फ्लॅटवर छापा पडताच समोर आला धक्कादायक प्रकार

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

ज्ञानेश कुमारांना सोडणार नाही! सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार; राहुल गांधींचा सर्वात मोठा निर्णय

Mobile Use In Toilet: टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने होऊ शकतो मूळव्याध, आजपासून सोडी ती वाईट सवय

SCROLL FOR NEXT