अनोख्या प्रेमाची अनोखी कहाणी! हरवलेल्या पत्नीची भेट तब्बल 'पाच' वर्षांनी  अश्विनी जाधव केदारी
मुंबई/पुणे

अनोख्या प्रेमाची अनोखी कहाणी! हरवलेल्या पत्नीची भेट तब्बल 'पाच' वर्षांनी

वाघा सिमेवरील कुलीच्या प्रेमाची गोष्ट

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे - पंजाब Punjab मधील अट्टारी येथे सैन्य दलातील एका कुलीची पत्नी 5 वर्षांपूर्वी हरवली होती, ती आता पुण्यातील Pune येरवडा येथील मनोरुग्णालयात Hospital सापडली आहे. या दरम्यानच्या काळात पती आणि त्यांच्या नातेवाईकांनी पत्नीला शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले. पत्नीवरील निस्सीम प्रेमामुळे पतीने दुसरा विवाह करण्यासही नकार दिला.

हे देखील पहा -

आपली पत्नी कधी तरी आपल्यला सापडेल अशी त्यांना आशा होती आणि पाच वर्षांनंतर त्यांची पत्नी पुण्यातील मनोरुग्णालयात सापडली आहे. या कुलीच्या पत्नी पंजाबमधील अमृतसरमध्ये मानसिक आजारावर उपचार घेत होत्या. दरम्यान त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर काही दिवस त्या तणावाखाली होत्या. या तणावामुळेच त्या रेल्वेत बसून अज्ञात ठिकाणी निघून गेल्या. दरम्यान पालघर पोलीस ठाण्यातून ठाणे मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना दोन वर्षांपूर्वी येरवडा येथील मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुण्यातील समाजसेविका प्रविना देशपांडे यांनी मेहक सोबत संवाद साधला.

पंजाबी भाषेतून त्या केवळ फौजी, कुली, अट्टारी अशा शब्दांचा उल्लेख करीत होत्या. त्यानंतर देशपांडे यांनी अमृतसर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी राजसिंग यांच्याशी संपर्क केला. वरिष्ठ अधिकारी राजसिंग यांनी मोबाईलवर कुलीच्या पत्नीचे छायाचित्र घेऊन ते समाज माध्यमावर व्हायरल केले. त्यामुळे कुली यांच्या पत्नीचा ठावठिकाणा सापडला, पती पत्नीने एकमेकांना पाहताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दह्यासोबत हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, फूड पॉयझनचा असतो धोका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू, मंचावर भाजप नेत्याच्या डुलक्या; व्हिडिओ व्हायरल

Narali Purnima 2025: यंदा नारळी पौर्णिमा कधी आहे?

Electric Shock : मोटार सुरु करताना विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू; माहेरच्यांचा मात्र घातपाताचा आरोप

Maharashtra Live News Update : रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक 15 तासानंतर सुरू

SCROLL FOR NEXT