Ram Mandir Inauguration Saam tv
मुंबई/पुणे

Ram Mandir Inauguration: मिरा-भाईंदरमध्ये २२ जानेवारीला मांस विक्रीची दुकाने बंद राहणार; पालिकेने घेतला मोठा निर्णय

Ram Mandir Inauguration Update: अयोध्येत येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे. राम मंदिर लोकार्पण सोहळ्याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी देशभरातील काही भागात मटण-चिकन विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत

Vishal Gangurde

महेंद्र वानखेडे, मिरा-भाईंदर

Mira Bhayandar News:

अयोध्येत येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे. राम मंदिर लोकार्पण सोहळ्याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी देशभरातील काही भागात मटण-चिकन विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत. त्यात आता मिरा-भाईंदर शहराचाही सामावेश झाला आहे. मिरा-भाईंदर पालिकेने २२ तारखेला मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर मिरा भाईंदरमध्ये २२ जानेवारीला मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तसेच पालिकेकडून मटण व चिकन विक्री करणाऱ्या दुकानांना बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अयोध्येत २२ जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन आणि मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर शहरातील वातावरण राममय झालं आहे. शहरातील गृहसंकुलांमधील इमारतींना आकर्षक विद्युत रोषणाई, भगवे झेंडे, प्रवेशद्वारावर कमानी आणि कंदील लावण्यात आले आहे. तसेच या सोहळ्यामुळे मिरा-भाईंदरमध्ये दररोज रामाची आरती, भजन आणि महाप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.

महापालिकेमार्फत शहरातील सर्वच धार्मिक स्थळाची स्वच्छता करण्यात येत आहे. आतापर्यंत पालिकेकडून ४८ मंदिरामध्ये रोषणाई लावण्यात आली आहे. त्यामुळे या दिवसाला एक पवित्र स्वरूप प्राप्त होणार आहे. त्यामुळे यादिवशी मटण, चिकन आणि मांस विक्रीवर किमान एक दिवसीय बंदी घालण्यात यावी, अशी मागणी सामाजिक संस्थानी पालिका आयुक्त संजय काटकर यांस कडे केली होती. त्यानुसार २२ जानेवारी रोजी शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. तसेच शहरांत मांस मटण विक्री करू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suraj Chavan kelvan : बिग बॉसचा हिरो चढणार बोहल्यावर; अंकिताच्या घरी थाटात पार पडलं केळवण, होणारी बायको आहे तरी कोण?

Panchang today in Marathi: आजचा दिवस कसा आहे? पंचांग, शुभ काळ आणि या चार राशींसाठी विशेष लाभ

Weather Alert : महाराष्ट्रात थंडीची चाहूल, अवकाळीपासून सुटका होणार, 'या' तारखेपासून गारठा वाढणार, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

Nagpur : नागपूर हादरले, ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू, भाचीला वाचवण्यासाठी गेलेल्या मामाचेही निधन

Maharashtra Live News Update: - नाशिकमध्ये थंडीची चाहूल, नाशिककरांनी आज अनुभवली धुक्याची चादर

SCROLL FOR NEXT