Pimpri Chinchwad School Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; संस्थाचालकासह ७ जणांना अटक

Pimpri Chinchwad School Crime News : पिंपरी चिंचवड शहरातील एका शाळेतील पीटी शिक्षकाने अल्पवयीन मुलीचं विनयभंग करून तिचा लैंगिक छळ केला.

गोपाल मोटघरे

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत बाल लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवड शहरातही अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना घडली. बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात शिक्षा झालेल्या आरोपीने पुन्हा एकदा त्याच्याच शाळेतील अल्पवयीन मुलीचं विनयभंग करून तिचा लैंगिक छळ केला.

याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून निगडी पोलिसांनी आरोपी शिक्षक आणि शाळेच्या संचालकासह ७ जणांवर बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. या सातही आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटकही केली. निगडी प्राधिकरणातील कीर्ती शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे.

निवृत्ती देवराम काळभोर असं विद्यार्थिनीचा लैंगिक छळ (Crime News) करणाऱ्या मुख्य आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्ती याने 2018 साली एका विद्यार्थिनीवर अत्याचार केला होता. याप्रकरणी निगडी पोलिसांनी त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा देखील दाखल केला होता.

पुढे न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. मात्र, त्यानंतर आरोपी हा जेलबाहेर आला. दरम्यान, आरोपीचे कृत्य माहीत असताना देखील कीर्ती शाळेच्या संचालकांनी त्याला पुन्हा कामावर रुजू करून घेतलं. यानंतर आरोपीने पुन्हा शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केला.

आरोपीवर गंभीर स्वरुपाचा गुन्हा असतानाही कामावर रुजू करून घेतल्याने कीर्ती शाळेच्या संचालकांनी जणू एका प्रकारे बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलं. त्यामुळे या प्रकरणात निगडी पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.

गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये कीर्ती शाळेचे प्राध्यापक अशोक जाधव कीर्ती शाळेची संस्था लि सोफिया एज्युकेशन सोसायटीचे संचालक रोहिदास बलभीम जाधव, लक्ष्मण नामदेव हेंद्रे,अविंद्र अंकुश निकम, गोरख सोपान जाधव, हनुमंत दादा निकम आणि शुभांगी अशोक जाधव अशा ७ आरोपींचा समावेश असून पोलिसांनी त्यांना अटकही केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, CM देवेंद्र फडणवीस परवानगीबाबत स्पष्टच बोलले, पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Update: सांगली: विट्यात ४२ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त

गणेशोत्सवात अचानक काळीज पिळवटून टाकणारी बातमी; डबलबारीच्या सम्राटाची अचानक एक्झिट, भजनक्षेत्रात शोककळा

Lasanache Pani: फक्त ३० दिवस प्या लसणाचे पाणी, शरीराला होतील फायदेच फायदे

BRICS : भारताने ब्रिक्सला 'दिशाहीन' होण्यापासून कसे वाचवले? दिल्ली जाहीरनाम्यातील 'ते' ५ मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT